Trichoderma – ट्रायकोडर्मा ही एक फायदेशीर बुरशी

Trichoderma - ट्रायकोडर्मा ही एक फायदेशीर बुरशी.

Trichoderma  – नक्कीच! ट्रायकोडर्मा ही एक फायदेशीर बुरशी आहे जी त्याच्या विविध फायद्यांसाठी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील काही पिकांवर रोगकारक असतात, तर काही बुरशी पिकांचे रोगांपसून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. या बुरशीचे कार्य, वैशिष्ट्ये आणि रोग नियंत्रणातील महत्त्व याविषयी जाणून घेऊ.

ट्रायकोडर्माच्या ८९ प्रजाती आहेत, त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हीरीडे आणि ट्रायकोडर्मा हरजेनियम ह्या दोन प्रजाती आपणास प्रामुख्याने ज्ञात आहेत. ह्या दोन प्रजातींचा वापर हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. ट्रायकोडर्मा व्हीरीडे आणि ट्रायकोडर्मा हरजॅनियम या दोन प्रजातींच्या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा लॉगिब्रॅन्चिटम (T.Iongibrachiatun), ट्रायकोडर्मा व्हायर्नस आणि एट्रोव्हिरीडे (T. virens T. atroviride), ट्रायकोडर्मा अॅस्पोरोलाईडस (T. asperelloides), ट्रायकोडर्मा सुडोकोनिंगी  (T. psetudokoningi) , ट्रायकोडर्मा एस्पेरलम (T. asperellurm ) ह्या व इतर काही प्रजाती देखिल शेती मध्ये उपयुक्त ठरतात.

Colony Growth of Trichoderma viride (01 PP) and Trichoderma harzianum... | Download Scientific Diagram
वरील चित्रात ट्रायकोडर्मा व्हीरीडे आणि ट्रायकोडर्मा हरजेनियम मधील फरक स्पस्ट दिसत आहे.

ट्रायकोडर्मा व्हीरीडे आणि ट्रायकोडर्मा हरजेनियम मधील फरक 

ट्रायकोडर्मा हरजेनियम ची वाढ म्हणजेच मायसेलियम हे फिक्कट हिरव्या रंगाचे असतात, तर ट्रायकोडर्मा व्हीरीडे चे मायसेलियम हे गद हिरव्या रंगाचे असतात. बुरशीच्या मायसेलिमय ला येणारी बाजुची वाढ (Branches) हा व्हीरीडे मध्ये मोठ्या असतात, तर हरजॅनियम मघ्ये लहान असतात.

ट्रायकोडर्मा वाढीसाठी 15 ते 30 डि. से. तापमान योग्य ठरते. जमिनीतुन वापरत असतांना जमिनीत मोकळी हवा खेळती राहील आणि वाफसा परिस्थिती राहील याची काळजी घ्यावी, ट्रायकोडर्माच्या वाढीसाठी हवेतील आर्द्रता ही 75 ते 85 टक्के इतकी असावी. ट्रायकोडर्मा बुरशी अलैंगिक पध्दतीने प्रजनन करते, त्यात हि बुरशी
कोनिडिया (ट्रायकोडर्माचे बीजाणू) तयार करते.

Enhanced root development in field crops induced by Trichoderma... |  Download Scientific Diagram
ट्रायकोडर्मा बुरशी ही जमिनीत मुळांचा कक्षेत किती महत्वाचे कार्य करते हे वरील फोटो मध्ये स्पस्ट दिसते.

ट्रायकोडर्मा ची वाढ

ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळुन येते, मुळांच्या परिसरात जास्त प्रमाणात ट्रायकोडर्माची वाढ दिसुन येते. मुळांच्या द्वारा स्रवल्या जाणाऱ्या विविध अन्नरसांपासुन ट्रायकोडर्माला अन्न मिळत असल्याने त्यांची वाढ हि मुळांच्या परिसरात फार जास्त प्रमाणात होते.ज्या प्रमाणे मायकोरयझा चे मुळांच्या वर थर बनतात, तसेच काहीसे ट्रायकोडर्मा करत असते. अशा प्रकारच्या वेष्टणामुळे जमिनीतील हानीकारक रोगांपासुन पिकाचे रक्षण होते. मुळांच्या वर असतांना काही प्रमाणात ट्रायकोडर्मा ही बुरशी मुळांच्या आत देखिल वाढते, ज्यामुळे पिकास रोगाचा हल्लाच झालेला आहे अशा प्रकारचे संदेश जावुन पिक तात्काळ त्याची संरक्षण प्रणाली सतर्क करते, यास आपण ज्या प्रमाणे लहान बाळांना लस देतो त्याच प्रमाणे पिकाची कार्य प्रणाली असते असे म्हणु शकतो. थोड्या शास्त्रिय शब्दात यांस सिस्टिमिक एक्कवायर्ड रसिस्टंस (SAR) असे म्हणतात. यात पिकाच्या एका बाजुला हल्ला झाला आहे, असे ज्यावेळेस पिकाच्या संरक्षण संस्थेला कळते, त्यावेळेस जेथे हल्ला झाला तेथे आणि पिकाच्या ईतर भागातील देखिल संरक्षण प्रणाली सतर्क राहते.
ट्रायकोडर्मा हि बुरशी पिकाच्या मुळांच्या आत जरी वाढत असली तरी, ती रसवाहीन्यांध्ये प्रवेश करत नाही. ट्रायकोडर्मा बुरशी चा वापर पिकांच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या हानिकारक बुरशी आणि जीवाणू याच्या विरोधात करत असतांना, हा वापर पिकाच्या बीज प्रक्रिया, नर्सरी मध्ये, पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात करणे हे फार गरजेचे आहे. जेव्हा अशा प्रकारे ट्रायकोडर्माचा वापर केला जातो, त्यावेस ट्रायकोडर्माची वाढ मुळाच्या वाढीसोबत होत राहते, तसेच मुळांवरिल ट्रायकोडर्माचे वेष्टण जास्त प्रभावीपणे तयार होते, तसेच जर वापरण्यात आलेली ट्रायकोडर्माची प्रजाती सक्षम असेल तर ती मुळांच्या वरिल थराच्या आत देखिल स्थिरावुन पिकासाठी लस म्हणुन कार्य करते.

ज्या जमिनीत हवा खेळती राहते, तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात असतो, त्या जमिनीत मुळांच्या खोलवरिल वाढीवर देखिल ट्रायकोडर्मा ची वाढ दिसुन येते. ज्यावेळेस ट्रायकोडर्मा हि बुरशी पिकाच्या मुळांच्या आत वाढत असते, त्यावेळेस तिच्या द्वारे जे काही अॅन्टीबायोटिक्स किंवा इतर ट्रव स्रावले जातात त्यांचे प्रमाण हे अल्प असे असते, ज्यामुळे पिकास ईजा न होता, पिकास केवळ रोगाचा हल्ला झालेला आहे असा संदेश मिळतो. पिकाच्या संरक्षण यंत्रणेला नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेला (Genes and J/ET Signaling pathways) चालना मिळते. ज्यावेळेस पिकाच्या मुळांच्या आत ट्रायकोडर्मा वाढते त्यावेळेस पिकाच्या पानांच्या आत देखिल हि संरक्षण यंत्रणा सिस्टिमिक एक्वायर्ड रसिस्टंस (SAR) मृळे कार्यान्वित झालेली असते.

एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, ट्रायकोडर्मा जरी मुळांच्या आत वाढत असली तरी हि बुरशी मुळांच्या आत काही थरापर्यंतच वाढते. त्याच्या पुढे हि बुरशी वाढत नाही. मुळांमधिल रस वाहीन्यात न शीरु शकल्याने हि बुरशी खोडातुन प्रवास करुन पानापर्यत जावु शकत नाही.

पिकाच्या मुळाच्या वर आणि काही प्रमाणात काही पिकांच्या मुळांच्या आत वाढुन ज्या पध्दतीने ट्रायकोडर्मा हि बुरशी पिकाचे मुळांचे रक्षण करते ते आपण बघितले, याशिवाय ट्रायकोडर्मा हि बुरशी ईतर अनेक विषारी द्रव स्रवते ज्यामुळे हानीकारक बुरशी, जीवाणूंचा नाश होतो.

ट्रायकोडर्मा हि हानीकारक बुरशी च्या वर वाढते, ट्रायकोडर्मा व्हिरिडे सेल्युलेज आणि चिटिनेज हे दोन एन्झाईम्स स्रवते. बूरशीच्या पेशी भित्तिका ह्या चिटिन (कायटिन / Chitin) पासुन बनलेल्या असतात, ट्रायकोडर्माद्वारा स्रवलेल्या चिटिनेज मुळे ह्या पेशी भित्तिकांना ईजा करुन ट्रायकोडर्मा बुरशी हानीकारक बुरशीच्या मायसेलियम वर वाढते. तसेच हानीकारक बुरशीच्या स्पोअर्स वर आणि जेथुन स्पोअर्स तयार केले जातात अशा स्पोरॅन्जिया वर देखिल वाढते. ट्रायकोडर्मा हानीकारक बुरशीवर ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्या हानीकारक बुरशीच्या आतील अन्नरसासाठीच ती वाढत असते, ह्यास मायको पॅरासिटिझम म्हणतात. ट्रायकोडर्मा ग्लिओव्हिरीन, ग्लिओटॉक्सिन, अल्किल पायरॉन्स ह्या सारखी ईतरही काही विषारी द्रव स्रवतात.

मायको पॅरासिटिझम आणि पिकाची स्वतःची संरक्षण यंत्रणा सतर्क करणे ह्या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा हि बूरशी पिकांस काही प्रमाणात फॉस्फोरस, फेरस ह्या अन्नद्र्व्याची उपलब्धता करुन देवुन आणि मुळांची तसेच पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत करु शकतील अशी संप्रेरके स्रवुन पिकास रोगाच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम देखिल करते.
मर्यादीत स्रोतांच्या स्पर्धेत जमिनीत आधी पासुन काही प्रमाणत असलेल्या ट्रायकोडर्माच्या कमी संख्येवर मात करत, योग्य प्रमाणात स्पोअर्स ची संख्या असलेले आणि शुध्द ट्रायकोडम्मा बाहेरुन वापरल्यास हानीकारक बुरशीच्या वाढीसाठी कमी स्रोत शिल्लक राहतात. ह्या स्पर्धेमुळे देखिल हानीकारक बुरशींवर नियंत्रण मिळवता येते.

ट्रायकोडर्माचा वापर हा विविध पिकांच्या मुळांवर हल्ला डॅपिग ऑफ, फ्युजरिम विल्ट, पिथियम विल्ट, फायटोप्थोरा, स्लेरोशियम ह्या रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

 ट्रायकोडर्मा हरजानियमचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (१) आणि लाईट मायक्रोस्कोप (२) खाली घेतलेले छायाचित्र.
ट्रायकोडर्मा हरजानियमचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (१) आणि लाईट मायक्रोस्कोप (२) खाली घेतलेले छायाचित्र.

ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धती

  • ट्रायकोडर्मा ही विविध पद्धतीद्वारे वापरता येते. उदा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी, पिकांवर फवारणीद्वारे आणि सेंद्रिय खत निर्मितीकरिता उपयोग होतो.
  •  बीजप्रक्रिया : ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास वापरावे. बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावे. बियाणे ओलसर होईल, इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.
  • ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशींनाशकांसोबत करू नये.
  • ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.

ट्रायकोडर्माचे ठळक कार्य

1. बायोकंट्रोल एजंट: ट्रायकोडर्मा हानीकारक बुरशी आणि नेमाटोड्ससह वनस्पतींच्या रोगजनकांच्या विस्तृत श्रेणीविरूद्ध बायोकंट्रोल एजंट म्हणून कार्य करते. हे या रोगजनकांशी पोषक आणि जागेसाठी स्पर्धा करते, त्यांची लोकसंख्या कमी करते आणि रोग दडपते.

2. वनस्पती वाढ प्रोत्साहन:ट्रायकोडर्मा मुळांचा विकास वाढवून वनस्पतींच्या वाढीस उत्तेजन देते. हे वनस्पती संप्रेरक आणि एन्झाईम्स तयार करते जे मुळांच्या फांद्या आणि वाढीस प्रोत्साहन देतात, परिणामी निरोगी आणि अधिक मजबूत वनस्पती बनतात.

3. पोषक विद्राव्यीकरण: या बुरशीमध्ये आवश्यक पोषक घटक जसे की फॉस्फरस जमिनीत विरघळविण्याची क्षमता असते. या पोषक द्रव्यांचे झाडे सहज शोषून घेऊ शकतील अशा स्वरूपात रूपांतरित करून, ट्रायकोडर्मा पोषक द्रव्ये शोषून घेण्यास आणि वनस्पतींचे पोषण सुधारण्यास हातभार लावते.

4. ताण सहनशीलता: ट्रायकोडर्मा झाडांना दुष्काळ, खारटपणा आणि जड धातूंची विषारीता यांसारख्या पर्यावरणीय ताणांना तोंड देण्यास मदत करते. हे असे पदार्थ तयार करते जे वनस्पतींमध्ये ताण सहनशीलता यंत्रणा ट्रिगर करतात, त्यांना अधिक लवचिक बनवतात.

5. मातीचे आरोग्य सुधारणा: ट्रायकोडर्मा मातीच्या स्थिर समुच्चयांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन मातीची रचना वाढवू शकतो. यामुळे मातीतील वायुवीजन, पाणी टिकून राहणे आणि मुळांमध्ये प्रवेश करणे, या सर्वांचा फायदा वनस्पतींच्या वाढीस होतो.

६. रासायनिक अवलंबित्व कमी: ट्रायकोडर्मा वापरल्याने रासायनिक कीटकनाशके आणि खतांची गरज कमी होऊ शकते. हे कीटक आणि रोग व्यवस्थापनासाठी एक नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करते, शाश्वत कृषी पद्धतींमध्ये योगदान देते.

7. बियाणे आणि मूळ उपचार: ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया म्हणून लावला जाऊ शकतो किंवा रोपण करताना जमिनीत जोडला जाऊ शकतो ज्यामुळे झाडाच्या मूळ क्षेत्राभोवती फायदेशीर सूक्ष्मजीव समुदाय स्थापित केला जाऊ शकतो, हानिकारक रोगजनकांपासून संरक्षण करतो.

8. जैव खते उत्पादन: ट्रायकोडर्मा आधारित जैव खते व्यावसायिकरित्या उपलब्ध आहेत. या उत्पादनांमध्ये थेट ट्रायकोडर्मा बीजाणू आणि सेंद्रिय पदार्थ असतात जे वनस्पतींसाठी पोषक उपलब्धता वाढवतात.

थोडक्यात, ट्रायकोडर्मा हा आधुनिक शेतीतील एक मौल्यवान सहयोगी आहे. त्याच्या वापरामुळे उच्च पीक उत्पादन, सुधारित मातीचे आरोग्य, कमी पर्यावरणीय प्रभाव आणि शाश्वत शेती पद्धती होऊ शकतात. जगभरातील शेतकरी कृत्रिम रसायनांचा वापर कमी करून त्यांचे कृषी उत्पादन इष्टतम करण्यासाठी ट्रायकोडर्मा-आधारित उत्पादनांचा अवलंब करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *