APMC Market Nasik- नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा

apmc market nasik

apmc marketAPMC Market Nasik– नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सय्यद पिंपरी (ता. जि. नाशिक) येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक येथील कृषी टर्मिनल मार्केट आढावा बैठकीत ते बोलत होते. (chhagan bhujbal direction for transfer of place for agriculture terminal market nashik news)

APMC Market Nasik -विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, नाशिक कृषिप्रधान जिल्हा असल्याने भाजीपाला, फळे व अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. राज्य कृषी पणन मंडळाने पिंपरी सय्यद (ता.नाशिक) येथील शासनाच्या गट क्रमांक १६२१ व गट नं १६५४ पैकी १०० एकर जमिनीची मागणी केली होती.

यावर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी जागांची पाहणीही केली आहे. त्यानुसार या गटातील १०० एकर जागा या प्रकल्पाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेला असल्याने जागा कृषी पणन मंडळाला हस्तांतरित करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *