Aloe Vera – खर्च कमी, उत्पन्न जास्त; कोरफडीची लागवड करून कमवा मोठा नफा

Aloe Vera – कोरफड ही वनस्पती कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. लिलियाशी या कुळातील ही बारमाही उष्णदेशीय वनस्पती असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, दक्षिण आशिया येथे उगवणारी ही एक बहुवार्षिक औषधी वनस्पती आहे. आफ्रिका, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे कोरफडीचे उत्पादन करण्यामध्ये अग्रेसर देश आहेत. या वनस्पती मुख्यत: कॉस्मेटिक कंपन्या, औषधी, अन्न इत्यादी मध्ये प्रामुख्याने वापरल्या जाते.

पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.

Cloud Farm Aloe Vera Plant Price in India - Buy Cloud Farm Aloe Vera Plant  online at Flipkart.com

हवामान –

कोरफड हे एक उबदार उष्णकटिबंधीय पिक असल्याने कोरफडीला उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. हि वनस्पती विविध प्रकारच्या वातावरणामध्ये जगू शकते. कमी पाउस पडणाऱ्या क्षेत्रात तसेच उबदार दमट वातावरणामध्ये ही वनस्पती चांगल्या प्रकारे येऊ शकत असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात याची लागवड करता येते. अत्यंत थंड प्रदेशामध्ये ही वनस्पती तग धरू शकत नाही.

जमिन –

कोरफड ही विविध प्रकारच्या मातीमध्ये लागवड करता येते. तथापि, हलकी ते मध्यम, वालुकामय व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास उत्तम असते. पाणी साठून राहणारी जमीन या पिकासाठी अत्यंत संवेदनशील आहे. चांगला निचरा केलेल्या काळ्या कापसाच्या मातीमध्ये या पिकाची वाढ लवकर होते. जमिनीचा सामू ८.५ च्या वर असल्यास तसेच खारट जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये. टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते.

ALOE VERA - घृत कुमारी घृत कुमारी या एलोवेरा, जिसे क्वारगंदल, या ग्वारपाठा  के नाम से भी जाना जाता है, एक औषधीय पौधे के रूप में विख्यात है। • जिंक ...

कोरफडीच्या काही विविध प्रकार

घृता कुमारी (कोरफड): 

ही कोरफडची सर्वात सामान्यपणे ओळखली जाणारी आणि मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी विविधता आहे. ही एक स्टेमलेस किंवा अतिशय लहान-स्टेम असलेली वनस्पती आहे जी 60-100 सेमी उंचीपर्यंत वाढते. त्यात जाड, मांसल, हिरवी पाने आहेत जी एक स्पष्ट जेल सारख्या पदार्थाने भरलेली आहेत ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

कुमारी (अॅलो बार्बाडेन्सिस) :

महाराष्ट्रात सामान्यतः आढळणारी ही कोरफडीची आणखी एक जात आहे. हे स्वरूप आणि गुणधर्मांमध्ये कोरफड सारखेच आहे, परंतु एक स्वतंत्र प्रजाती मानली जाते. कुमारीचा उपयोग त्याच्या उपचार आणि कॉस्मेटिक गुणधर्मांसाठी देखील केला जातो.

ग्वारपाथा (एलो फेरॉक्स): 

ग्वारपाथा ही कोरफडीची एक मोठी विविधता आहे जी आफ्रिकेतील रखरखीत प्रदेशात आढळते. यात जाड, काटेरी पाने आहेत जी 1 मीटर लांबीपर्यंत वाढू शकतात. ग्वारपाठामधून काढलेले जेल त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरले जाते आणि त्याचा रेचक प्रभाव असल्याचे मानले जाते.

कडवा कुमारी (कोरफड आर्बोरेसेन्स):

कडवा कुमारी ही कोरफडीची एक उंच, झाडासारखी विविधता आहे जी 3 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. त्यात हिरवी, तलवारीच्या आकाराची पाने आहेत जी कडांवर दांतेदार असतात. कडवा कुमारीपासून काढलेले जेल त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरले जाते, विशेषत: त्याच्या दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या प्रभावांसाठी.

जिवंती (एलो परफोलियाटा): 

जिवंती ही कोरफडीची एक लहान, झुडूप असलेली विविधता आहे जी भारतातील रखरखीत प्रदेशात आढळते. त्यात पातळ, रसाळ पाने आहेत जी रोझेट पॅटर्नमध्ये व्यवस्थित आहेत. जिवंतीपासून काढलेले जेल त्याच्या थंड आणि सुखदायक गुणधर्मांसाठी वापरले जाते आणि बहुतेकदा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते.

कोरफड (कोरफड सेराटा): 

कोरफड ही कोरफडीची एक लहान, झुडुपासारखी जात आहे जी महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागात आढळते. त्यात जाड, हिरवी पाने आहेत जी पांढऱ्या डागांनी झाकलेली आहेत. कोरफाडपासून काढलेले जेल त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरले जाते आणि त्वचेवर शांत प्रभाव पडतो असे मानले जाते.

 

आधी वर्णन केलेल्या कोरफडच्या सहा जातींव्यतिरिक्त, कोरफडच्या इतरही अनेक प्रजाती आहेत ज्या महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागात आढळतात. यामध्ये कोरफड  चिनेन्सिस, एलो कॉंगोलेन्सिस, अॅलो दावेई आणि अॅलो क्रापोहलियाना यांचा समावेश आहे. या प्रजाती पूर्वी नमूद केल्याप्रमाणे सामान्यतः वापरल्या जात नसल्या तरीही, त्यांच्याकडे काही औषधी किंवा कॉस्मेटिक मूल्य असू शकते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे कीकोरफडचे अनेक प्रकार आहेत, परंतु ते सर्व आंतरिक किंवा बाहेरून वापरण्यासाठी सुरक्षित नाहीत. कोरफडच्या काही प्रजाती विषारी असू शकतात किंवा त्याचे अवांछित दुष्परिणाम होऊ शकतात, विशेषत: मोठ्या प्रमाणात किंवा दीर्घकाळापर्यंत वापरल्यास. याव्यतिरिक्त, बाजारात विकल्या जाणार्‍या कोरफड उत्पादनांमध्ये इतर घटक किंवा पदार्थ असू शकतात जे हानिकारक किंवा कुचकामी असू शकतात.

890+ Aloe Vera Field Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock  | Beautiful skin

व्यावसायिक प्रजाती –

एलो बार्बीडेन्सीस, पर्फोलियाटा, चीनेन्सीस, लीट्टोरालीस, इंडिका, अबायसिनिका, व्हुल्गारसी, एएल-१, आयसी १११२६९, आयसी १११२७१, आयसी १११२८०, इत्यादी.

लागवड –

कोरफडीची अभिवृद्धी फुटव्या-मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड पूर्ण करावी. लागवडीसाठी जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. एकरी ५ ते ८ टन चांगले कुजलेले शेण व लेंडी खत मिसळावे. जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा सरी-वरंबे तयार करावेत. लागवड करतांना दोन ओळीत ६० किंवा ७५ सें.मी. व दोन झाडात ४५ किंवा ६० सें.मी. अंतर ठेवावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. पिकाच्या वाढीच्या काळात एक-दोन खुरपण्या करुन वाफे तणरहीत ठेवावेत. बुंध्याजवळील माती भुसभुसशीत ठेवल्याने झाडाची वाढ चांगली होत असल्याचे निदर्शात आलेले आहे.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

कोरफड ही औषधी वनस्पती असल्याने त्यात रासायनिक खतांचा वापर टाळून गांडूळ खत व निंबोळी खताचा वापर करावा. जमीन हलकी असल्यास, रासायनिक खते द्यायची असल्यास माती परीक्षणानुसार प्रति एकरी १५ किलो नत्र, १० किलो स्फुरद व १० किलो पालाश द्यावे.

पाणी व्यवस्थापन –

जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या अवस्थेनुसार पिकास पाणी द्यावे. पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरफडीस पाण्याची जास्त आवश्यकता नसते. याउलट उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे  १२ ते १५ दिवसातून एकवेळ पाणी द्यावे लागते.

एलोवेरा (घृतकुमारी) के फायदे, उपयोग और नुकसान - Aloe vera ke fayde, labh,  istemal, nuksan in hindi

पिक संरक्षण –

पानावर काळे ठिपके, मूळकूज, करपा या रोगांचा तर पिठ्या ढेकुण, वाळवी या किडींचा प्रार्दुभाव कोरफड पिकावर आढळून येतो. पानावर काळे ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी  गंधकयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा.

कापणी व उत्पादन –

पानाचे टोक किंवा पानाचा रंग पिवळसर झाल्यानंतर, पूर्ण वाढ झालेल्या पानांची साधारणतः लागवडीनंतर १४ ते १६ महिन्यांनी कापणी करतात. वर्षाला सुमारे दोन कापण्या करतात. एक कापणी ऑगस्ट महिन्यामध्ये तर दुसरी कापणी जानेवारी महिन्यामध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे एकरी ५ ते ८ टन ओली पाने मिळतात. काढणीपूर्वी झाडास पाणी दिल्यास पानातील पाण्याचे प्रमाण वाढते. कोरफडीची गुणवत्ता पानांच्या आकारावर व मांसलपणावर आधारित नसून त्यामध्ये असलेल्या ‘ऍलोइन’ या औषधी तत्त्वावर अवलंबून असते. म्हणून कोरफड काढण्यापूर्वी एक महिना अगोदर पाणी तोडावे. मागणीनुसार कंपनीच्या वेळेमध्ये बदल करतात. कापणी करताना मुख्य झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सुमारे चार ते पाच वर्षांनी हे पीक पुन्हा लावावे लागते. कमी मेहनत व कमी खर्चात उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत कोरफड किफायतशीर ठरते. कोरफड प्रक्रियेतून सरबत, ज्यूस बनवून जास्त आर्थिक फायदा करून घेतला जावू शकतो.

कोरफडीच्या शेतीसाठी येणारा खर्च किती?

इंडियन काउन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्चच्या (ICAR) म्हणण्यानुसार, एका हेक्टरमध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी 27,500 रुपये खर्च येतो. तर मजूरी, शेत तयार करणं, खत याचा खर्च गृहित धरून हा खर्च पहिल्या वर्षी 50,000 रूपयांपर्यंत जातो. अशाप्रकारे एकरानुसार बोलायचं झाल्यास 20 हजार रुपये खर्च येतो. एका हेक्टरमध्ये पहिल्या वर्षी सुमारे 450 क्विंटल कोरफडीची पानं मिळतात. कोरफडीच्या पानांचा दर प्रतिक्विंटल 2000 रुपये आहे. अशा प्रकारे एका हेक्टरमध्ये एका वर्षात 9,00,000 रुपयांचे उत्पादन होते. कोरफडीचे उत्पादन दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी वाढते आणि ते 600 क्विंटलपर्यंत पोहोचू शकते.

कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टीकर, बलकर व विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी उपयोगी आहे. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यावर सुध्दा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी आहे. सौदर्यवृध्दीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे.

बाजारपेठेच्या मागणीवरच कोरफड उत्पन्नाची हमी असते. म्हणून स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड करणे योग्य होईल. स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. कोरफड शेती करताना अनेक शेतकरी कंपन्यांशी करार पद्धतीने शेती करतात; परंतु यामधून लागवडीनंतर फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर असल्याने बाजारपेठ व प्रक्रिया उद्योजकांशी ठराव करून, योग्य काळजी घेऊनच कोरफड लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *