Bordo Paste – बोर्डो मिश्रण घरच्या घरी कसे बनवावे….

Bordo Paste– पीक संरक्षणात वापरण्यात येणाऱ्या  अनेक बुरशीनाशकांमध्ये  बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे. फ्रान्समधील बोर्डो या विद्यापीठातून या मिश्रणाचा शोध लागला.  म्हणून त्याला बोर्डो मिश्रण असे म्हणतात..

सन 1761 मध्ये, स्लॅथेझ यांनी गहू रोगांच्या बियाण्यावरील उपचारांसाठी प्रथम तांबे सल्फेटचा वापर केला. नंतर प्रीव्हॉस्टने तांबेला बुरशीनाशक म्हणून संबोधले.फ्रान्समध्ये १८७८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केवडा रोग (डावणी मिल्डू) उद्‍भवला होता त्यावेळी वरील मिश्रण फवारलेल्या बागांतील द्राक्षवेलींची पाने रोगमुक्त राहिल्याचे वनस्पतिशास्त्रचे प्रोफेसर मिलार्डेट यांना आढळले. 1882 मध्ये, फ्रान्समधील मिलार्डेट (बोर्डेक्स युनिव्हर्सिटी) चुकून प्लास्मोपारा विटिकोलामुळे झालेल्या द्राक्षाच्या बुरशीविरूद्ध कोपर सल्फेटची कार्यक्षमता पाहिली. जेव्हा तांबे सल्फेटला चुना निलंबन मिसळले जाते तेव्हा त्याने रोगाचा प्रादुर्भाव प्रभावीपणे तपासला. तांबे सल्फेट आणि चुन्याच्या मिश्रणास “बाउली बोर्डोलाईस” (बोर्डो मिक्चर) असे नाव देण्यात आले.

बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद, कळीचा चुना व पाणी यांची आवश्यकता असते. पिकाच्या अवस्थेनुसार सर्वसाधारणपणे १ टक्का,०.९टक्का, ०.८ टक्का, ०.६ टक्का, ०.५ टक्का, व ०.४ टक्कातीव्रतेचे बोर्डो मिश्रण वापरतात. पण लहान  व नाजूक रोपांवर सौम्य अश्या कमी तीव्रतेचे मिश्रण वापरतात.पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जातो.

Bordo Paste
बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी –

  • कळीचा चुना वापरताना तो दगडविरहित असावा.
  •  मिश्रण करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये.
  •  फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे.
  •  दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत.
  •  फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे.
  •  पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव (स्टिकर) वापरावे.
  •  मिश्रण बनविण्यासाठी चांगले पाणी वापरावे. क्षारयुक्त पाणी वापरू नये.
  •  विरी गेलेला चुना किंवा भुकटी वापरू नये.
  •  मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा.

बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत :-

बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद ठराविक प्रमाणात वजन करून घेऊन पाण्यात विरघळावे. हे  द्रावणधातूच्या भांड्यात न करता यासाठी लाकडी टीप, मातीची भांडी किंवा प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करावा.बोर्डोमिश्रण तयार करण्याकरिता धातूची भांडी वापरू नयेत. १% बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी १ किलो मोरचुद१किलो कळीचा चुना १०० लीटर पाणी वापरावे,

याप्रमाणे मोरचुद  एक किलो घेवून ते प्लास्टिकच्या  बादलीत  पाच लिटर पाणी घेवून भिजवावे  आणि वेगळ्या प्लास्टिक चे बादलीत पुन्हा पाच लिटर पाणी घेवून त्यात कळीचा चुनाभिजवावा मोरचूद व चुना पूर्ण भिजल्यावर हे मिश्रण गाळून घ्यावे . मोरचुदाचे द्रावण व चुन्याचे द्रावण एकाचवेळी  तिसरऱ्‍या प्लास्टिकच्या भांड्यात ओतून त्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण १०० लिटर होईल इतके पाणी घालावे. मिश्रण तयार झाल्यावर त्याच दिवशी वापरावे.  भविष्यातील वापराकरिता बोर्डो मिश्रण तयार करून किंवा साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे बोर्डो मिश्रणाचा वापर तयार केल्यापासून १२ तासांच्या आत करावा.

तसेच वापरण्यापूर्वी ते रासायनिक दृष्ट्या उदासीन आहे याची खात्री करावी.

मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी :-

मिश्रण फवारणीच्या वेळी फडक्‍यातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्यावे. मोरचूद विरघळण्यास उशीर लागतो, म्हणून फवारणी करण्याच्या दोन ते तीन तास अगोदर ते पाण्यात विरघळत ठेवावे. मोरचूद कापडी पिशवीत घेऊन लोंबकळत ठेवावे. तसेच मिश्रण करते वेळी तिसऱ्या भांड्यात दोन्ही द्रावण ओतताना प्रथम चुन्याचे आणि पाठोपाठ मोरचुदाचे द्रावण ओतून मिश्रण सारखे ढवळावे. एकदा तयार केलेले मिश्रण त्याच दिवशीवापरावे.

Bordo Paste- बोर्डो मिश्रणाची योग्यता तपासण्यासाठी चाचणी –

मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकास अपाय होण्याची शक्याता असते. म्हणून बोर्डो मिश्रण पिकावर फवारण्यापूर्वी फवारण्यास योग्य आहे, की नाही याची चाचणी घेणे आवश्य्क असते.

1) पी.एच. पट्ट्या – सामू पाहण्यासाठी सध्या बाजारात पिवळसर रंगाच्या पी.एच. पट्ट्या मिळतात. या पट्ट्यांबरोबर वेगवेगळ्या रंगछटा असलेली 1 ते 10 पर्यंत सामू दर्शविणारी पट्टी मिळते. सामू पाहण्यासाठी पिवळी पट्टी तयार बोर्डो मिश्रणामध्ये बुडवावी व त्यास आलेली रंगछटा सामूदर्शक पट्टीवरील कोणत्या रंगास जुळतो ते पाहावे. ज्या रंगास ती जुळते तो मिश्रणाचा सामू समजावा. सामू सातपेक्षा कमी असल्यास मिश्रणात चुन्याचे द्रावण अगदी थोडे थोडे ओतत व ढवळत जावे. उदासीन द्रावणासाठी असलेला सामूचा रंग येताच बंद करावे.

2) लिटमस पेपर चाचणी – निळा लिटमस पेपर द्रावणात बुडविल्यानंतर जर लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद आहे किंवा द्रावण आम्ल आहे असे समजावे. मिश्रणातील जास्त मोरचूद नाहीसे करण्यासाठीमिश्रणात परत चुन्याचे द्रावण निळा लिटमस पेपर निळाचराहीपर्यंत टाकावे.

3) लोखंडी खिळा किंवा सळई – तयार मिश्रणात लोखंडी खिळा किंवा सळई दहा सें.मी. द्रावणात बुडविले असता त्यावर तांबूस रंग चढला तर(तांबडा दिसणारा थर तांब्याचे सूक्ष्म कण जमून झालेलाअसतो)  द्रावण फवारण्यास योग्य नाही असे समजून थोडी थोडी  चुन्याची निवळी ओतावी. ही निवळी ओतण्याची क्रिया लोखंडी खिळा किंवा सळई यावर जमणारा  तांबडा थर नाहीसा होईपर्यंत करावी म्हणजे मिश्रण

बोर्डो मिश्रणाची, तीव्रता तसेच सामू (पीएच) या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत.बोर्डो मिश्रणाचा रंग आकाशी असावा तसेच सामू उदासीन (७.००) असावा. तयार केलेल्या मिश्रणाची चाचणी निळा लिटमस पेपरने घ्यावी.

फवारण्यास योग्य होईल.

बोर्डो मिश्रणाचा उपयोग :-

बोर्डो मिश्रण हे अल्प किंमतीमध्ये तयार होणारे,वापरण्यास बिनधोक व बऱ्‍याच रोगांवर उपयुक्त आहे., रोपांचे मृत्यू,बटाट्यावरील करपा, द्राक्षावरील तंतुभुरी,लिंबावरील खैरा, भुईमुगावरील टिक्का, पानवेली, टोमॅटो, हळद, इत्यादींच्या पानांवरील ठिपक्यांच्या रोगावर तेवापरतात. फळ धारणेच्या  वेळी बोर्डो मिश्रण फवारताना  काळजी घेणे आवश्यक आहे.काही वेळा त्याच्या फवारण्यामुळे काही फळावर   परिणाम दिसू शकतो . काही पाश्चात्य देशांत मात्र  निर्जलित बोर्डो मिश्रण तयार मिळते.

जमिनीतीलबुरशीमुळे होणारे मर, मूळकूज, खोडकूज, इ. रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा बोर्डो मिश्रण एक टक्का हे एक उत्तमबुरशीनाशक आहे.

बोर्डो मिश्रणाची तीव्रता व आम्ल:-

विम्लांक किंवा सामू(पीएच) या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. यावर यामिश्रणाची शक्ती अवलंबून असते. तयार झालेले बोर्डोमिश्रण फवारणीसाठी योग्य झाले किंवा नाही याची खात्रीकरून घ्यावी. तयार झालेले बोर्डो मिश्रण शक्‍य  तितक्‍यालवकर फवारावे, ते जास्त वेळ ठेवू नये.मिश्रण तयारझाल्यानंतर १२ तासांच्या आतच वापरावी. आणि 100 लिटर पाणी लागते.

बोर्डो मिश्रणाचा फळपिकावरील रोगनियंत्रणासाठी वापर –

1) आंबा करपा 0.8% द्रावण पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन फवारे आणि जून ते ऑगस्टपर्यंत 4 फवारण्या कराव्यात.
2) केळी पानांवरील ठिपके 0.8% द्रावण जून ते ऑगस्टपर्यंत 2-3 वेळा फवारणी करावी.
3) डाळिंब पानांवरील काळे डाग 0.8% द्रावण बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर 1-2 फवारे आणि फळांचा काढणी करेपर्यंत 3-4 फवारे करावेत.
खोडावरील काळे डाग 1% द्रावण
फळावरील काळे डाग 1%. द्रावण
4) पपई पानावरील ठिपके 1% द्रावण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत एकेक फवारा द्यावा.
5) लिंबूवर्गीय (संत्रा, मोसंबी व लिंबू)फळे- पानांवरील काळे डाग 1% द्रावण (बहरानंतर 2-3 फवारे) जिवाणूंमुळे होणारा करपा 1% द्रावण मे ते डिसेंबर महिन्यांत एकेक फवारा द्यावा.
शेंडामर 1% द्रावण वर्षातून 2-4 वेळा
0.8-1% द्रावण फळे सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर पुढे 3-4 फवारे द्यावे.
6) सीताफळवर्गीय फळे पानांवरील काळे डाग 0.8% द्रावण पावसाळ्यापूर्वी 1 ते 2 वेळा फवारणी करावी.
7) द्राक्ष करपा 1% पावसाळ्यापूर्वी एक आणि नंतर पुढे सप्टेंबर – ऑक्टो बरपर्यंत महिन्यातून 1 ते 2 वेळा अशी एकूण 6 ते 8 वेळा फवारणी करावी.
8)जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर, मूळकूज, खोडकूज, इ. रोगाच्या नियंत्रणासाठीसुद्धा बोर्डो मिश्रण एक टक्का हे एक उत्तम बुरशीनाशक आहे.

 2)भाजीपाला पिकावरील रोगनियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर:

बटाटा, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळावर्गीय भाज्या, कोबी, वाटाणा इ. पिकांवरील करपा, काळा करपा, पानांवरील ठिपके, केवडा, भुरी, जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर करता येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणांची तीव्रता ठरवावी. साधारणतः भाजीपाला पिकांसाठी ०.५ ते ०.६% तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य असते. यापेक्षा जास्त प्रमाण वापरल्यास काही पिकांमध्ये दुष्परिणाम होण्याची शक्‍यता असते. जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर, मूळकूज, खोडकूज, इ. रोगाच्या नियंत्रणासाठीसुद्धा बोर्डो मिश्रण एक टक्का हे एक उत्तम बुरशीनाशक आहे.

सुचना

1. सध्या (बोर्डोचा)याचा पी एच आय किंवा एम आर एल (मैक्सिमम रेसिडुल लेव्हल)काय आहे माहीत नाही.

2.एन आर सी कड़े माहिती घेणे. (यूरोप मार्केटिंग करणाऱ्यानी) कारण दरवर्षी लीस्ट अपडेट होत असते. शक्यतो माल तोड़नी अगोदर 40 दिवस (ट्रायको किंवा वर्टिसिलिएम सारखे) जैविक सोडून कोणतेही केमिकल फवारु नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *