Fertilizer : कोट्यवधी रुपयांचा अप्रमाणित खतसाठा जप्त …..

Fertilizer
Fertilizer
Fertilizer

Amravati  : कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईत एका गोदामातून २ कोटी रुपयांचे खत जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील पृथक्करणाअंती हे खत अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कारवाई दरम्यान अप्रमाणित असल्याच्या संशयावरून एक पोते खत जप्त करण्यात आले होते.

याचा पुरवठा कोठून झाला याची चौकशी केली असता कृषी विभागाला माहुली जहागीर येथील खतसाठ्याची माहिती मिळाली. त्याआधारे १९ ऑगस्टला कारवाई करीत हा खतसाठा जप्त करण्यात आला. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईनंतर या प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी दुसऱ्याच दिवशी ३० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची स्थापना केली.

दरम्यान, पथकाने तेलंगणात जाऊनही काही कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे खत अप्रमाणित असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे अशा अप्रमाणित खताची खरेदी करून त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकासाठी पोषक व आवश्‍यक घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे या खताचा पिकांना पुरेसा फायदा होऊ शकत नाही, असे अहवालात समोर आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
(स्त्रोत -अग्रोवोन )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *