Fertilizer- रासायनीक खते पिकाला केव्हा व किती दिवसात लागतात ?

Fertilizer

Fertilizer- रासायनिक दाणेदार व विद्राव्य खताचा पिकांना मिळण्याचा कालावधी.

शेतकरी मित्रानो आपल्या शेतामध्ये जे आपण दाणेदार खत टाकतो ते किती दिवस शेतामध्ये, मातीमध्ये राहते व किती टक्के पिकाला लागू होते.जे काही आपण वेगवेगळी दाणेदार खते असेल ती आपल्या पिकाला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या मात्रे मध्ये आपण देतो ती किती टक्के पिका द्वारे घेतली जातात. किंवा त्याची कार्यक्षमता किती टक्के असते आणि किती दिवसा पर्यंत आपल्या जमिनीमध्ये त्या पिकाला लागू होतात त्या बाबत आपण माहिती घेऊया.

रासायनीक दाणेदार खते 

युरिया खत

Fertilizer – दाणेदार खतांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजे युरिया खत होय. हे खत ज्या वेळेस आपण शेतामध्ये टाकतो तेव्हा त्यामध्ये नत्र हे अमाईड (amid) स्वरूपातील असतं.हे खत ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये / मातीमध्ये टाकल्या नंतर याचा कालावधी 2 ते 8 दिवस म्हणजेच दुसऱ्या दिवशी लागू होण्यास सुरुवात होते तर आठ दिवसापर्यंत उपलब्ध अवस्थेमध्ये पिकाला मिळत असतं.

10:26:26

दुसरे महत्त्वाचे वापरले जाणारे खत म्हणजे दाणेदार स्वरूपातील 10:26:26 यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे तीनही घटक आहेत.यामधील जो नत्र आहे तो नत्र चौथ्या दिवसापासून ते आठवा दिवसापर्यंत उपलब्ध अवस्थेत पिकाला मिळते. त्या नंतर या मधील दुसरा घटक आहे तो म्हणजेच स्पुरद 10:26:26 हे खत टाकल्या नंतर स्फुरद हे दहा दिवसापासून ते 32 दिवसापर्यंत आपल्या पिकाला उत्तम प्रकारे मिळत असत. आणि त्यानंतर जो तिसरा घटक आहे तो म्हणजे पालाश तर 10:26:26 पिकाला टाकल्यापासून पालाश हे 45 दिवसा नंतर ते 65 दिवसापर्यंत पालाश हे पिकाला उपलब्ध होत असतो. म्हणजे यावरून आपल्याला एक कळते की 10:26:26 आपण आपल्याला पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये द्यायला हवं.

DAP

यानंतर तिसरे दाणेदार खत आहे ते म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट (DAP). DAP दोन घटक आहे ते म्हणजे नत्र आणि स्फुरद. या मधील जे नत्र आहे ते DAP शेतात टाकल्यानंतर दोन दिवसापासून ते आठ दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध असतं आणि यामधील स्फुरद जे आहे ते DAP शेतात टाकल्यापासून 10 दिवसापासून ते 32 दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध होतं असतं.

12:32:16

या खता मध्ये तिनही घटक आहेत ते म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश असतो. या मधील जे नत्र जे आहे ते 12:32:16 खत शेतामध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते आठव्या दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध होतं असत. त्या मधील दुसरे घटक म्हणजे स्फुरद हे खत टाकल्यानंतर नवव्या दिवसापासून ते अठरा दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध होत राहतं. घटक तिसरा म्हणजे पालाश आहे. हे खत शेतात टाकल्यानंतर पालाश पिकाला 45 दिवसापासून ते 55 दिवसापर्यंत मातीच्या माध्यमातून पिकाला मिळत असतं.

सिंगल सुपर फॉस्फेट (SSP)

सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या शेतामध्ये टाकल्यापासून स्फुरद हे 24 दिवसापासून ते 46 दिवसापर्यंत आपल्या शेतामध्ये आपल्या मातीमध्ये उपलब्ध राहत आणि याच काळामध्ये आपल्या पिकांमधून ते उचलल्या जातात व पिकाला मिळत.

 

म्युरेट ऑफ पोटॅश (MOP)

MOP मध्ये पालाश हा घटक असून जेव्हा आपण MOP शेतामध्ये टाकतो तेव्हा 45 दिवसा पासून ते 70 दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध राहतो याच काळात पिकाच्या मुळाद्वारे हे खत शोषण केल्या जाते.

 

 विद्राव्य खत (Liquid Fertilizer )

विद्राव्य खत – 12:61:0

यामध्ये नत्र आहे आणि स्फुरद आहे. तर हे खत पिकाला दिल्यानंतर यामधील नत्र जे आहे ते चौथ्या दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत आपल्या पिकाला मिळत. यामधील खतामधील स्फुरद जे आहे ते सातव्या दिवसापासून 21 दिवसापर्यंत पिकाला मिळत असतो.

विद्राव्य खत – 19:19:19

या विद्राव्य खता मध्ये समप्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश हे घटक असून जेव्हा आपण शेतामध्ये 19:19:19 विद्राव्य खत दिल्या नंतर नत्र हे पाच दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत आपल्या पिकाला मिळत राहतं. यामधील स्फुरद जे आहे ते हे खत टाकल्यापासून सहाव्या दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध राहतं आणि जे पालाश घटक आहे तो दहाव्या दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत आपल्या पिकाला उपलब्ध राहतो.

विद्राव्य खत – 13:0:45

13:0:45 जे खत आहे याच्या मध्ये नत्र आणि पालाश हे दोन घटक आहे. या मधील जे नत्र आहे ते आपल्याला चौथ्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध होते.तर यामधील जो पालाश घटक आहे तो जमीनत टाकल्यापासून अकराव्या दिवसापासून ते 25 दिवसापर्यंत आपल्या पिकाला मिळत राहतो.

विद्राव्य खत – 0:52:34 

या खता मध्ये नत्र नसून फक्त स्फुरद आणि पालाश आहे तर हे खत शेतात टाकल्यानंतर नत्र घटक हा सातव्या दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला मिळत असतो यामधील जे पालाश आहे तो अकरा दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध अवस्थेत मिळत राहतो.

विद्राव्य खत – 0:0:50 

या खता मध्ये फक्त पालाश चे प्रमाण असून जेंव्हा हे खत आपण शेतामध्ये दिल्यानंतर पालाश सहाव्या दिवसापासून ते बाराव्या दिवसापर्यंत आपल्या पिकाला उपलब्ध राहतो तर ते या काळात चांगल्या कार्यक्षमतेने पिकाला मिळत असतात.

शेतकरी मित्रांनो यावरून आपल्याला एक लक्षात येईल की, आपण शेतामध्ये जेव्हा खत टाकतो तेव्हा ती कितव्या दिवसापासून घ्यायला सुरुवात करतो तर किती दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध राहतो हाच त्याचा ॲक्टिव पिरियड  कालावधी राहतो. पण शेतकरी मित्रांनो हा कालावधी तसा प्रत्येक ठिकाणी असतोच असे नाही कारण की आपल्या भागामध्ये वेगवेगळे वातावरण असते वेगवेगळे जमीन आहे त्यानुसार व आपल्या मातीचे गुणधर्म आहे या वर ते अवलंबून असते. तसेच आपण जे शेतात पाणी वापरतो याचा पण सामू  या खतांच्या कार्यक्षमते वर परिणाम करू शकतो.या खताचा ॲक्टिव पिरियड हा जसास तसा नसणार त्यामुळे आपल्या मातीचे परीक्षण व पाणी परीक्षण करूनच या प्रकारे खताचे नियोजन करता येईल.

तरी वरील माहिती फक्त तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्यात आलेली आहे. तरी या बाबत काही शंका असेल तर आपण स्वतः याची खात्री दुसऱ्या एखाद्या माध्यमाद्वारे करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *