Indicators – पिकावर किडी-रोग येण्याचे संकेत

Indicators of pests and diseases on your crop.

Indicators – अनेक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी व रोग बदलत्या हवामानामुळे येत असतात, त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा शेतकऱ्यांची नुकसान त्याठिकाणी नक्कीच होते.

त्यामुळे आपल्या पिकांवर कोणत्या किडी येणार आहेत व कोणते रोग येणार आहेत याचे संकेत (Indicators) आपल्याला जर मिळाले तर नक्कीच आपण त्या किडींवर व रोगावर लवकर मात करू शकतो.

  • Indicators  – पहिला मावा मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. त्यावरून ओळखायचे, आपल्या पिकात तो येणार.
  • शेपूचा शेंडा पांढरा पडला तर बुरशी येण्याचे संकेत.
  • मेथीवर पांढरे डाग पडले तर बुरशी येण्याचे संकेत.
  • मक्‍याची सिंगल लाइन करून त्याचे कंपाउंड केले व कांदा शेतातही लावल्यास थ्रिप्स कमी येतो. मक्‍याच्या पोंग्यात मित्रकीटक लवकर तयार होतात. मक्‍यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो. तो कांद्यावर येत नाही.
  • झेंडूची झाडे शेतात अधिक असली तर लाल कोळी आधी झेंडूला खातो. सूत्रकृमीलाही झेंडू अटकाव करतो.
  • गोमूत्र व मीठ फवारणीने काळा मावा नियंत्रणात येतो.
  • करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायची, मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात पाने टाकायची. मावा मरतो.
  • हिरवी मिरची व लसूण व गरजेएवढे थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची, त्यामुळे अळीचे नियंत्रण होते.
  • एका एकरात आठ तुळशी लावल्या तर त्याच्या वासाने शत्रुकीटक पिकाजवळ येत नाहीत.
  • लिंबाच्या पाल्याची वा गवरीची जाळून राखुंडी तयार करून ती पिकावर धुरळल्यास नागअळी नियंत्रणात येते.
  • रसशोषक किडींसाठी चिकट सापळे उपयुक्त ठरतात.
  • फळमाशीसाठी गंध रसायन (ल्यूर) चिकट सापळ्याच्या ठिकाणी ठेवल्यास ती तेथे येऊन सापळ्याला चिकटते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *