NANO DAP – नॅनो DAP Liquid Fertilizer

NANO DAP Liquid Fertilizer

NANO DAP – डाय-अमोनियम फॉस्फेटपासून बनविलेले वनस्पती पोषक खत, जे वनस्पतींना नायट्रोजन आणि फॉस्फरसची आवश्यक पोषक द्रव्ये  देण्यासाठी वापरले जाणारे एक सामान्य खत आहे. नॅनो डीएपी हे पाण्यात विरघळणारे खत आहे जे थेट वनस्पतीच्या मुळांवर किंवा चांगल्या शोषणासाठी फोलिअर अनुप्रयोगाद्वारे लागू होते.

पारंपारिक रासायनिक खतांच्या तुलनेत नॅनो/लिक्विड डीएपी उच्च पोषक द्रव्ये घेण्याची कार्यक्षमता आहे,आणि लिचिंगचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीपण वापर करण्यापूर्वी स्वत: च्या शेती पद्धतीत कोणत्याही नवीन खतांची कार्यक्षमता पडताळून पाहण्याची शिफारस केली आहे आणि कृषी तज्ञाच्या माहितीनुसार वापर करावा.नॅनो/लिक्विड डीएपी हे प्रगतशील नवीन तंत्राचे उत्तम आणि वापरण्यासाठी चांगले आहे,त्याबद्दल माहिती या लेखात दिली आहे. NANO DAP.

रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे जमिनीची प्रत दिवसेंदिवस खालावत आहे. याचाच मानवाच्या आरोग्यावर ही विपरीत परिणाम होत आहेत. यांना आळा घालावा यासाठी आपल्या देशात सर्वप्रथम नॅनो तंत्रज्ञाने तयार केलेले नॅनो युरिया तसेच नॅनो DAP हे रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरावर आळा घालण्यास उपयुक्त आहेत.

मागील पोस्टमध्ये आपण नॅनो युरीया बद्दल सविस्तर जाणून घेतलेले आहे तर आपण या पोस्टमध्ये नॅनो डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) या द्रवरूप खताबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील सर्वात मोठी Fertilizer सहकारी संस्था इफको (IFFCO) यांनी नॅनो युरिया यानंतर आता नॅनो डीएपी तयार केले आहे. याचा उद्देश हा आहे की खताच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचा एक भाग म्हणून हा नॅनो DAP तयार करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न आहे.

सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी रासायनिक खताचा बेसुमार वापर सुरू असून त्यामुळे जमिनीची प्रत खालावत असून हा सजीवांचे आरोग्यासाठी ही धोकादायक ठरत आहे त्यामुळे रासायनिक खतांचा बेसुमार वापर कमी व्हावा त्यासाठी नॅनो तंत्रज्ञान तयार झालेल्या खतांचा वापर करणे कधीही चांगले आहे याच्या वापरामुळे पीक उत्पादन व त्याची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते.

नॅनो टेक्नॉलॉजी ने तयार केलेले द्रवखत हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व शेती क्षेत्रासाठी चांगले भविष्य मिळावे म्हणून आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले आहे

नॅनो DAP हे द्रवरूप खत पिकामधील पोषक घटकांची गुणवत्ता तसेच पिकाच्या चांगल्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी असून तसेच पर्यावरणाचे दृष्टीने ही चांगले आहे यामुळे जागतिक तापमान वाढीच्या समस्या ही कमी होण्यास मदत मिळेल.

नॅनो डीएपी(DAP) म्हणजे काय

नॅनो DAP हा नायट्रोजन (N) आणि फॉस्फरस (P)  चा सर्वोत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे जमिनीतील नत्र आणि स्फुरद या पोषक घटकाची कमतरता दूर होण्यास मदत होते.

पारंपारिक डीएपी खताच्या एका बॅग मध्ये जेवढे प्रमाण आहे तेवढेच प्रमाण नॅनो DAP च्या 500 मिली च्या एका बॉटलमध्ये आहे.

नॅनो DAP द्रव्यरूप खतांचे फायदे

नॅनो डीएपी द्रव्य खत वापरण्यासाठी जैविक दृष्ट्या सुरक्षित आहेत तसेच मृदा प्रदूषण पाणी आणि वायू/ हवा प्रदूषण सुद्धा कमी करण्याचे काम करते.

नॅनो डीपीच्या वापरामुळे पारंपरिक डीएपी चा वापरा बाबत आयात कमी होईल यामुळे वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च सुद्धा कमी होण्यास मदत मिळेल.

नॅनो DAP आर्थिदृष्ट्या परवडणारे

शेतकरी बाजारातून डीएपी ची एक बॅग अनुदानावर 1350 रुपया पर्यंत खरेदी करतात तर शेतकऱ्यांचा हा खर्च 50% पर्यंत कमी करून नॅनो डीएपी च्या 500 मिली च्या एका बॉटल ची किंमत 600 रुपये पर्यंत आहे म्हणजेच जे घटक एका डीएपीच्या 50 किलोच्या बॅगेमध्ये आहेत तेवढेच घटक अर्धा लिटर नॅनो डीएपीच्या एका बॉटलमध्ये आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा इथे एक खतावर होणारा 50 टक्के अतिरिक्त खर्च कमी होत आहे.

पारंपरिक डीएपी दाणेदार खत पिकाला आपण चुकीच्या पद्धतीने दिल्या जाते किंवा पाण्याद्वारे हे वाहून जाते त्याच्यामुळे नॅनो डीएपी चा वापर हा पिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो याचा ऱ्हास पण कमी होतो.

नॅनो डीएपी चा वापर आपण फवारणी द्वारे करू शकतो फवारणी करिता 2 ते 4 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे नॅनो डीएपी ची फवारणी करू शकतो म्हणजे जवळपास अर्धा लिटर मध्ये एक एकर क्षेत्रासाठी पुरेशे आहे.म्हणजेच शेतकर्यांचे एक एकर मध्ये 600 रूपये पर्यंत बचत होते.

नॅनो DAP व नॅनो युरिया हे आपल्याला बाजारामध्ये जर घ्यायचे असेल तर इफको च्या अधिकृत विक्रेते यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावेत तसेच IFFCO च्या site वरून हे खत आपण ऑनलाईन मागणी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *