युवा शेतकरीने “पॅशन फ्रुट ” नवीन फळाचा केला यशस्वी प्रयोग !

pesion- Fruit-Farming

पॅशन फ्रुट – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता अवलंबून असून परंपरागत शेती पद्धती आणि पिकांची जागा आता आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांनी घेतलेली आहे. जर आपण यामध्ये फळ पिकांचा विचार केला तर ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे पिकांची लागवड तर शेतकरी करत आहेतच परंतु जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश म्हणजेच एकंदरीत उत्तर भारतात येणारे सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवलेली आहे.

pesion- Fruit-Farming
pesion- Fruit-Farming

या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांची अफाट जिद्द आणि प्रयोगशीलता हे गुण खूप महत्त्वाचे ठरताना दिसून येत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण पॅशन फ्रुट या नवीन फळाचा विचार केला तर हे अनेक आजारांवर उपयुक्त असणारे फळ असून या पिकाचा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या कचरवाडी या गावचे अमर बरळ या युवा शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवलेला आहे. विशेष म्हणजे हा या परिसरातील पहिलाच प्रयोग असल्याचे म्हटले जात आहे. या अनुषंगाने आपण या लेखात याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

पॅशन फ्रुट – विविध आजारांवर उपयुक्त असणाऱ्या ‘पॅशन फ्रुट’या नवख्या फळ पिकाचा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर पांडुरंग बरळ या युवा शेतकऱ्याने यशस्वी केला आहे. विशेष बाब म्हणजे ‘पॅशन फ्रुट’ या फळ लागवडीचा या परिसरातील पहिलाच प्रयोग आहे.’पॅशन फ्रुट’या फळांमध्ये मानवी आरोग्यासाठी लाभदायक असणारे विविध गुणधर्म लपलेले आहेत. या फळा संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने घेतलेला हा विशेष रिपोर्ट…

‘पॅशन फ्रुट’हे वेलवर्गीय फळ आहे. त्यामुळे याला औषधाची गरज भासत नाही. शेणखताचा वापर केल्याने फळे चांगली लागतात. या फळाला कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. केवळ फळ माशांवर नियंत्रण ठेवावे लागते यासाठी या युवा शेतकऱ्याने फळ माशांचे ट्रॅप लावून माशांवर नियंत्रण ठेवले आहे.’पॅशन फ्रुट’हे शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने पिकवले जात आहे. सध्या हे फळ काढणीला आले आहे.

ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयत्न …

मेट्रो सिटी मध्ये या फळाला सर्वाधिक मागणी आहे. सुरुवातीला या फळांच्या विक्रीचे व्यवस्थापन पुणे येथे केले होते. सध्या उत्पादन जास्त असल्याने बरळ या शेतकऱ्याचा ऑनलाइन विक्री करण्याचा मानस आहे. बिगबास्केट, ॲमेझॉन, रिलायन्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मागणी आहे. त्यानुसार सॅम्पल देऊन दर निश्चित केला जाणार आहे. त्यानुसार फळांची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या फळ पिकाच्या लागवडीसाठी स्टेजिंग करणे आवश्यक असते. यासाठी एकूण तीन लाख रुपये खर्च आला एकदा स्टेजिंग केल्यानंतर पुढे दहा ते बारा वर्ष त्याचा खर्च येत नाही. आत्ता काढणीला आलेल्या पिकातून साडेतीन ते टन माल निघेल. आणि त्याच्यातून ४ लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे बरळ यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *