पिक संजीवके : पिकांसाठी उपयुक्त संजीवके संप्रेरके यांचे कार्य, वापर व फायदे …….

Plant Growth Promoter

पिक संजीवके

आधुनिक शेतीमध्ये नवनविन तंत्रज्ञान विकसीत होत आहे त्या आधुनिक शेतीचा महत्वाचा भाग म्हणजे संजिवके. हि संजीवके बाजारात विवीध नावाने अनेक स्वरुपात उपलब्ध आहेत त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होऊ शकते. वनस्पती अंतर्गत शोध घेऊन त्याच्यातील काही रासायनिक घटकांना कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत तयार करुन त्यांचा वापर योग्यप्रकारे पिकांवर केल्यास पिकांचे उत्पादन वाढवतायेते.
वनस्पतीच्या शारीरिक क्रियांवर ताबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिकरीत्या वनस्पतींमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके अथवा वनस्पतीवृद्धी संप्रेरके या नावाने ओळखले जाते.
वनस्पतीच्या विविध शरीरक्रियांत वाढ करणे, त्या थांबविणे, त्यांचा वेग मंदावणे किंवा त्यांच्यात बदल घडवून आणणे अशा प्रकारचे अनेक परिणाम या संजीवकांमुळे वनस्पतींमध्ये आढळून येतात.

संजीवके म्हणजे काय ?

भाजीपाला उत्पादनात पिकाची वाढ ही बाब महत्त्वाची आहे. म्हणून पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी जशी संजीवके उपयोगी पडतात त्याप्रमाणे वाढीचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतात म्हणून त्यांना झाडाची वाढ नियंत्रके, असें संबोंधलें जाते.

पिके संजीवके अतिशय सूक्ष्म प्रमाणात वापरावी लागतात. त्यांचा वापर अंदाजाने करू नये. तसे केल्यास दुष्परिणाम होतात म्हणून दिलेल्या परिमाणातच त्यांचा वापर करावा.

संजीवके द्रावणाची पद्धत

संजीवके हौ भुकटी अथवा द्रव स्वरूपात असतात. काही संजीवके अल्कोहोलमध्ये, तर काही पाण्यात विरघळतात. परतु, ही संजीवके बाजारामध्ये वेगवेगळ्या तीव्रतेची असल्याने उदा. जीए (९९ ठक्के ),

सौ.सी.सी. (५० टक्के ), इथेल (४० टक्के ) या तीव्रतेवरून संजीवके पाण्यात अथवा अल्कोहोल मिश्रण तयार करावे लागते. उदा. लिहोसीन  ५० टक्के दोन मिलि एक लिटर पाण्यात मिसळल्यास १००० पी.पी.एम. द्रावण तयार होतें.

 

पीक संजीवकांचे वर्गीकरण पाच वेगवेगळ्या गटांत केले आहे.ते खालीलप्रमाणे…..

१) ऑझिन्स :

  • यांच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते उदा.- आय.ए.ए., आय.बी. ए.
  • कलम करताना भिन्न वनस्पतींच्या पेशींचा एकजीव करण्याचा उद्देश असतो. फळपिके, विविध शोभेच्या झुडपांच्या व फुलझाडांच्या अभिवृद्धीमध्ये ऑक्‍झिनचा वापर यशस्वितेने करता येतो.
  • पानांवर व फळांवर ऑक्सीनची फवारणी केल्यामुळे फळांची व पानांची अकाळी गळती टाळता येते.
  • द्राक्षाची बियाविरहित प्राप्त करण्यासाठी ऑक्सिनचा वापर केला जातो.
  • वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी, तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरता अंजीर, सफरचंद, अननस, पीच, चहा, गुलाब, बोगनवेलिया, रबर इत्यादी झाडांच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी केला जातो.
  • 2, 4-डी आणि एन.ए.ए.च्या वापरामुळे टोमॅटो, वांगी, अंजीर यांची फळधारणा सुधारून उत्पन्न वाढते, तर एनएएमुळे सफरचंदाच्या फुलांची विरळणी होऊन उरलेल्या फळांचे आकारमान वाढते व त्याचा रंग व दर्जा सुधारतो.

२) सायटोकायनिन :

  • या संजीवकांच्या अंगी वनस्पती पेशी विभाजनाची क्षमता आढळते उदा.– कायनेटिन.
  • पेशींची वृद्धावस्था टाळणे, बीज अंकुरणासाठी बिजांची सुप्तवस्था लवकर संपविणे.
  • प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे करणे इ. सायटोकायनिन्स उपयोगी ठरते.
  • संप्रेरक वनस्पतीमधील पेशींची वाढीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि ती पुढे चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतात. याच्या वापरामुळे वनस्पतीमधील पेशींचे दीर्घीकरण होऊन पानांची लांबी-रुंदी वाढते.तसेच, वनस्पतींच्या अवयवाची (पाने, फळे, फुले इ.) जीर्णता लांबवते. उदा. कायनेटीन, झायटीन.

३) जिब्रेलीन्त :

  • या संजीवकांत पेशी विभाजनाची व त्यांची लांबी वाढविण्याची अथवा या दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. उदा.- जी.ए.1 ते जी.ए. 59
  • बीजाची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिन्स गटातील संजीवकामध्ये बिया काही काळ भिजविल्यास बियांची उगवण चांगली व लवकर झालेली आढळते.वाढिचा वेग वाढवणे तसेच बियाविरहीत फळ प्राप्त करण्यासाठी जिबरेलिन्स उपयोगी आहे.
  • काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी स्त्रीलिंगी फुलापासून फळे मिळतात म्हणून पुल्लिंगी फुलांचे प्रमाण व वाढ कमी करून स्त्रीलिंगी फुलांची संख्या अधिक प्रमाणात व लवकर आणण्यासाठी 100 पीपीएम जिब्रेलिक आम्ल वापरतात.

४) वाढ नियंत्रके :

  • वनस्पतीच्या शरीरांतर्गत चालणाऱ्या क्रिया कमी करण्याची अगर पूर्णपणे थांबविण्याची, नियंत्रित करण्याची क्षमता या गटातील संजीवकांच्या अंगी आढळते.काही पिकांमध्ये फलधारणा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने विरळणीची गरज भासते पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येत असल्याने त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
  • बऱ्याच वेळा हवामान, सूर्यप्रकाश यातील बदलांमुळे अथवा नैसर्गिक हंगामात फांदीच्या टोकास वाढ, संजीवकाचे जादा प्रमाण तयार झाल्याने फळझाडांना बहर निघत नाही.
  • त्याकरिता द्राक्ष, अंजीर, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी यांसारख्या फळझाडांवर हवामान व त्यांची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन वाढरोधक गटांतील संजीवकांचा क्रमाने केलेला वापर परिणामी बहर काढण्यात मदतीचा ठरतो.

५) इथिलीन (इथ्रेल) : या संजीवकाचा वापर प्रामुख्याने फळांचा आकार व वजन वाढविणे तसेच फळास रंग येणे इ. गुणधर्मांसाठी करण्यात येतो. याचबरोबर, वनस्पतीमध्ये मादी फुलांची संख्या वाढविण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो.

बाजार मध्ये उपलब्ध काही उत्पादने …

संजीवके, संप्रेरके, पीक पोषके व टॉनिक्स अजून तरी शासनाच्या बंधनात नसल्याने त्यासाठी कुठला कायदा नाही. परिणामी, शेकडो संधिसाधू कंपन्या निकृष्ट उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे व दुःखाची गोष्ट म्हणजे अनेक पटींनी किंमत वाढून व गरज नसतांना किंवा चुकीच्या वेळी आपले काही कृषी व्यावसायिक याची सर्रास विक्री करत आहेत. यामुळे अशा गुणवत्ताशून्य संजीवक संप्रेरकावरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत चालला आहे.

यांच्या वापराने निश्चित फायदा होतो. मात्र, गुणवत्ता चांगलीच असावी. योग्य वेळीच वापर व्हावा व किंमतसुद्धा परवडणारी असावी यासाठी ही सर्व उत्पादने तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा चांगल्या विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानेच वापरावीत. यामध्ये बदल करू नये. आपण मागितलेलीच उत्पादने मिळण्यासाठी आग्रही असावे. कोणतीच दोन उत्पादने सारखी नसतात किंवा एकमेकांसारखी शक्यतोवर नसतात. त्यांच्या वापरामध्ये बदल करावयाचा असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर करावा. फक्त झाड हिरवे होणे म्हणजेच चांगले रिझल्ट आले असे नाही.

Lihocin Plant Growth Regulator Starting @405 – BigHaat.com

क्लोसीन/लिव्होसीन (क्लोरोमेकॉट क्लोराईड)

क्लोसीन/लिव्होसीन या रसायनाचा उपयोग पिकाच्या कायिक वाढीचे रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी करतात. हे फवारल्यानंतर पिकाच्या फांद्या, उंची, पाने यांचा आकार व संख्या कमी वाढून मिळालेल्या अन्नद्रव्याचा वापर हा पाते, फुले लागण्यासाठी अन्नद्रव्य पानांमध्ये साठवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे पिकाच्या अवास्तव वाढीवर नियंत्रण येते  त्याचा फायदा जास्त फूलफळधारणेमध्ये होतेवेगवेगळ्या पिकांमध्ये लिव्होसीनचा वापर वेगवेगळ्या प्रकारे  वेगळ्या प्रमाणात होतो.

कापसाला लिव्होसीनचा वापर फवारणीद्वारे करतात. यामध्ये दोन पद्धती आहेत. एक म्हणजे पीक ७५ दिवसांचे असताना एकाच फवारणीत लिव्होसीन  मिली प्रतिपंप वापरायचेदुसरी म्हणजे पीक ५० दिवसांचे असताना १ मिली, ६० दिवसाला २ मिली व ७० दिवसाला ३ मिली प्रतिपंप वापरायचे. पहिल्या पद्धतीमध्ये फवारणीनंतर झाडाची वाढ थांबून जाईल व फळधारणा होईल व दुसऱ्या पद्धतीमध्ये झाडाची वाढ हळूहळू मंदावेल व तेवढ्याच प्रमाणात जोरात पाते, फुले लागतील. आपल्याला हवी तशी वाढ आपण ठेवू शकू. ज्या ठिकाणी भरपूर अन्नद्रव्ये देतात व ज्या शेतात कापूस खूप वाढतो अशा ठिकाणी दुसरी पद्धत वापरतात. एखाद्या वेळेस खत जास्तच दिलेले असेल व ७० दिवसाला कापूस दाटण्याची शक्यता असल्यास ३ मिलीऐवजी ४ मिली लिव्होसीनचा वापर करावा. जसे सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, मूग या व इतर अनेक पिकांमध्ये क्लोसीन/लिव्होनीसनचा वापर पीक कळी अवस्थेत असताना करावा. त्यानंतर वापरल्यास त्याचे परिणाम दिसत नाहीत व या पिकांसाठी याप्रमाणेसुद्धा जास्त शिफारशीत आहे.

क्लोरोमेकॉट क्लोराडटचे व्यापारी नावे क्लोसीन/लिव्होसीन व व्हॅमसी आहेत. कापसामध्ये यांचा वापर चुकूनही ४ मिली प्रतिपंप यापेक्षा जास्त करू नये.

स्टिमुलंट

पिकामधील अनेक प्रकारच्या गतिविधी वाढवण्यासाठी  पिकास उत्तेजक प्रेरक म्हणून स्टिमुलंटचा वापर करतातज्यामुळे पात्यांच्या  फुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेझाडाची सर्वांगीण वाढ जोरात होऊन बोंडांचा आकार वाढतोपानांचा आकार वाढतोझाडाची भूक वाढते आणि या सर्व परिणामांमुळे खूप कमी खर्चात मोठा फायदा म्हणजेच मोबदला मिळतोबाजारामध्ये शेकडो प्रकारचे स्टिमुलंट अनेक नावाने उपलब्ध आहेत; पण त्यातील विश्वासपात्र व्यक्तीने शिफारस केलेले वापरावे.

स्टिमुलंटचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा व अन्नद्रव्ये असावीत याची काळजी घ्यावी. ओलावा कमी असेल किंवा खतांचा वापर मोजकाच असेल तर स्टिमुलंटचा वापर टाळावा. कापसासाठी झेप/उडाण, भरारी/ फ्लाईट किंवा इलिग्झर यापैकी एक स्टिमुलंट पाते लागलेले असताना एक फवारा व त्यानंतर १० ते १५ दिवसांनी दुसरा फवारा घेतल्यास उत्पादनाम ध्ये चांगली वाढ होते. इतर पिकांसाठी जसे सोयाबीन तूरहरभऱ्यासाठी फुलोरा अवस्थेत वरील स्टिमुलंटचा वापर करावा.

बायोस्टिमुलंटचे वेगवेगळे प्रकार, कार्ये व प्रमाण आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना फवारल्यानंतर पीक हिरवे झाले म्हणजे, समाधान होते व वापरले ते फार चांगले असे वाटते. मात्र, ही महागाची उत्पादने फक्त हिरवेपणा वाढवण्यासाठी वापरून फायदा नाही, तर असे बायोस्टिमुलंट वापरावे.

ज्यामुळे हिरवेपणा वाढेल, पाते, फुलांची संख्या वाढेल. पानाबोंडांचा आकार वाढून पिकाची सर्वांगीण वाढ होईल, तसेच त्यांचे प्रमाण माहीत असावे. काही बायोस्टिमुलंट १० लिटर पाण्यासाठी फक्त २.५ मिली व काही १० लिटर पाण्यासाठी ७ ते १० मिली वापरण्याची शिफारस आहे.

झेप/उडाण, भरारी फ्लाईट(Paris agrotech) , इलिग्झर यांची गुणवत्ता चांगली असल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. बायोस्टिमुलंट समजून उमजून खात्रीच्या दुकानांवरून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उच्च गुणवत्तेचे वापरल्यास खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळतो. या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडे  आग्रही असावे. त्याला पर्यायी दूसरे स्टिमुलंट शक्यतो घेऊ नये.

Chemical Grade Granules Jiashree Gajab Ulta Plant Growth Regulator, Bottle,  500 ml

गजब

गजब हे निसर्गातील दुर्मिळ घटकांपासून तयार केलेले अत्यंत प्रभावी संजीवक आहे. गजब फवारल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा झपाट्याने उचल होऊन त्या अन्नद्रव्यांचा वापर पिकांचे फूल, फळ वाढीसाठी होऊन पिकामध्ये हरितद्रव्ये वाढून गर्द हिरवेपणा बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतो.

Sumitomo Chemical India Pvt. Ltd Sumitomo Progibb (Gibberellic Acid A.I. :  90% W/W) Plant Growth Regulators (Pgrs) (1 * 2) 2Gm : Amazon.in: Garden &  Outdoors

जी..

जी.ए.च्या वापरामुळे पिकामधील अवयवांच्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ होते  पेशींचा आकारसुद्धा वाढतो. म्हणजेच पानांवर फवारले असता पानांचा आकार वाढतो. बोंडांवर फवारले असता बोंडांचा आकार वाढतो. वाढ खुंटलेल्या झाडांची वाढ व्हावी यासाठी वाढीच्या अवस्थेमध्ये १०० लिटर पाण्यात एक ग्रॅम जी.ए. व ७० टक्क्यांपेक्षा जास्त बोंडे तयार झाल्यानंतर बोंडाचा आकार व वजन वाढण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात त्या अवस्थेमध्ये जी.ए. फवारतात. जी.ए. पाण्यात विरघळत नसल्याने एकतर असिटोन, ट्राइकंटेनॉल किंवा देशी दारूमध्ये आधी विरघळून घेऊन नंतर ते पाण्यात टाकावे. जी.ए.चा अनावश्यक वापर करू नये. गरज नसताना वापरल्यास पानांचा आकार फार मोठा होतो. फांद्या वाढतात. अनावश्यक वाढीने झाड ठिसूळ होते. पाने, बोंडे गळू शकतात. म्हणून जी.ए. गरज असेल तेव्हाच समजून-उमजून वापरावे. फरदड घेताना नवीन पालवी पाने लहान असताना १ ग्रॅम जी.ए.चा वापर ३ पंपांमध्ये करावा तसेच फरदडच्या बोंडांच्या वाढीसाठीसुद्धा जी.ए. वापरावे. यामुळे फरदडमध्ये भरपूर उत्पादन मिळते.

Dow Agroscience Dow Miraculan - Triacontanol 0.05% Ec, Plant Tonic (100Ml)  : Amazon.in: Garden & Outdoors

ट्राइकंटेनॉल

ट्राइकंटेनॉलचा वापर हा पिकाची प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढावी यासाठी करतात. साधारणतः जेव्हा जास्त दिवस ढगाळ वातावरण असते व प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावून झाडाची वाढ खुंटते अशा वेळेस ट्राइकंटेनॉल विपुल, मिरेकल, मिरॅकुलॉन १० लिटर पाण्यात २० मिली टाकून फवारल्यास प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वाढ होते व झाडाची झपाट्याने वाढ होते.

Buy Planofix Growth Promoter Starting @₹190/- – BigHaat.com

एन..

प्लॅनोफिक्सचा वापर पातेगळ व फूलगळ कमी करण्यासाठी करतात. नैसर्गिक गळ जेव्हा मोठ्या प्रमाणात होते अशा वेळेस याचा वापर योग्य प्रमाणात करावा. १० लिटर पाण्यात ५ मिलीपेक्षा जास्त वापरल्यास नुकसानसुद्धा होऊ शकते. पात्याच्या व फांदीच्या जोडावरील पोकळी कमी किंवा नष्ट करण्याचे काम हे करते. मोठ्या गॅपनंतर पावसाचा अंदाज असल्यास वातावरणामध्ये एकदम बदल होणे अपेक्षित असल्यास त्यापूर्वीच प्लॅनोफिक्स वापरावे.

शॉकअब/रनर

शॉक-अब/रनर हे उत्पादन तणनाशकासोबत फवारण्यास वापरतात. जेव्हा निवडक तणनाशके पिकामध्ये फवारले जातात तेव्हा तण नियंत्रित होते. मात्र, तणनाशकामुळे मुख्य पिकालासुद्धा थोडा शॉक लागतो, काही ठिकाणी पिकामध्ये पिवळेपणा येतो. कुठे पिकाची वाढ खुंटते, अशा वेळेस मुख्य पिकाला पोषक  तणास घातक   ठरेल  तणनाशकाचा परिणाम मुख्य पिकावर जास्त जाणवणार नाही यासाठी तणनाशकासोबत ही उत्पादने वापरतात. तुलनात्मक स्वस्त व दीर्घकालीन परिणामकारक हे उत्पादन ४० ते ५० मि.लि. प्रतिपंप फवारण्याची शिफारस आहे. शॉकअबचा वापर कापसामध्ये हिटवीड, टरगासुपरसोबत करतात तसेच याचा वापर मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या तणनाशकांसोबत होतो.

अनिवडक तणनाशके जसे की ग्लाइफोसेट पॅराक्वॉट डायक्लोराइड जे सर्वच पीक असो की तण सर्वच संपवते अशा तणनाशकासोबत हे वापरू नये. फक्त उभ्या पिकामध्ये सोयाबीन, कापूस, ऊस फवारल्या जाणाऱ्या तणनाशकांसोबत वापरावे.

Buy Agriculture Fertilizers Products Online at Agriplex India

एम्बिसन 

हे एक अत्यंत प्रभावी अमीनो आम्ल असून याचा वापर पिकांची वाढ, सर्वांगिण विकास, फूटव्यांची संख्या वाढवणे, गर्द हिरवेपणा व सोबतच मुळांचा विकास व्हावा यासाठी करतात. हे उत्पादन विशेषतः भाजीपाला पिकांसाठी अत्यंत प्रभावी व परिणामकारक आहे.

 

या प्रकारे कोणत्याही संजीवकाचा किंवा संप्रेरकाचा वापर हा फार फायद्याचा ठरू शकतो व त्यावर केलेल्या खर्चापेक्षा मोठ्या पटीमध्ये मोबदला मिळू शकतो. मात्र, त्याचा वापर समजून-उमजून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा व चांगल्या गुणवत्तेचीच शिफारसीत उत्पादने वापरावीत. कोणतीच दोन उत्पादने सारखी नसल्यामुळे आपल्याला हवे असलेल्या उत्पादनासाठी विक्रेत्याकडे आग्रह धरावा.

 

संजीवके वापरण्याच्या पद्धती :

  • बियाण्यांवर प्रक्रिया करून जमिनीवर फवारणी.
  • पानांवर किंवाफळांवर फवारणी.
  • द्रावण तयार करून जमिनीतून देणे.
  • रोपांची मुळे बुडविणे.
  • फक्त विशिष्ट भागावर वापर.
  • बियाणे/ रोपे यांवर उपचार करणें.
  • जमिनीत निरवणी करून,
  • संजीवके द्रावणामध्ये उत्पादन बुडविणे.

संजीवकाचा वापर करताना त्याबरोबर बुरशी नाशक, कीटकनाशक, पोषणट्रव्य इत्यादींचा वापर केल्यास पिकाची नियमित वाढ व त्याचप्रमाणे बुरशी, कीटक यांनाही आपण आला घालू शकतो.

पीक संजीवके ही नैसर्गिक किंवा प्रक्रिया करून निर्माण केलेली असतात.

संजीवके वापरताना घ्यायची काळजी

१) संजीवकांचे योग्य प्रमाण व वाढीच्या अवस्था यांचा मेळ हवा. जमिनीवरून एखाद्या संजीवकाचा वापर करायचा असल्यास द्रावणाचे प्रमाण जास्त असावे. हवेतून फवारणीद्वारे द्यायचे असल्यास द्रावणाचे प्रमाण कमी असावे. संजीवके विरघळण्याचे योग्य ते द्रावण तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरावे.

२) वेगवेगळ्या संजीवकांचे गुणधर्म भित्न असल्यामुळे उष्णता व हवेचेप्रमाण कमी असताना करावा. संजीवकांचा वापर शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी उष्णता व हवेचे प्रमाण कमी असताना करावा.

नवीन संजीवकांचा वापर पिकाच्या थोड्या भागावर करून अनुभव घेऊनच मग मोठ्या प्रमाणावर करावा.

३) संजीवकांच्या वापरासंबधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सांगितलेले संजीवक वापरावे. पिकांवर कोणती संजीवके व केव्हा वापरली आहेत, याची नोंद ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *