माती परीक्षण – काळाची गरज ….

माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस ‘मृदा आरोग्य पत्रिका’ असे नाव आहे.

मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी:

  • मातीचा नमुना घेण्यासाठी शक्यतो लाकडी काठी किंवा दांडा ला टोकदार करून वापरावे आणि नसेल तर मग फावडे, कुदळ,खुरपी स्वच्छ करून वापरावे.
  • मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतू नांगरणी पुर्वी घ्यावा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ:करण करुन परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.
  • उभ्या पिकांखालील मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमुना घ्यावा. परंतु पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आत संबधित जमिनीतून माती नमुना घेवू नये.
  • निरनिराळया जमिनीतील नमुना गोळा करताना वेगवेगळया मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
  • माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करु नये.
  • शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुने घेवू नयेत.

मातीचा नमुना घेण्याची पध्दत:

  • मातीचा नमुना हा त्या शेतातील प्रातिनिधीक स्वरुपाचा असणे आवश्यक आहे. एक हेक्टर क्षेत्रातील 15 सेंमी खोलीपर्यंतच्या मातीचे वजन अंदाजे 22,40,000 किलो ग्रॅम असते. यातून काढावा लागणारा 500 ग्रॅम मातीचा नमुना प्रातिनिधीक होण्यासाठी किती काळजीपुर्वक घ्यावा लागेल याची कल्पना येते. कारण यामधून केवळ काही ग्रॅम माती तपासणीसाठी वापरली जाते व तिच्या तपासणीच्या निष्कर्षावर आधारित खताच्या शिफारशी केल्या जातात. म्हणून मातीचा नमुना काळजीपुर्वक काढावा.
  • मातीचा नमुना काढण्यासाठी शेतात गेल्याांतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार वनस्पती/ पिकांचा रंग, वाढ भिन्न भिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्ठभागावरचा रंग देखील वेगवेगळा असतो. उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते म्हणूनच उतार रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पिक पध्दतीनुसार विभागणी करावी आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या वेगळा प्रातिनिधीक नमुना घ्यावा.
  • एक सारख्या जमिनीतून नमुना घेताना काडी कचरा, गवत, पिकांची धसकटे व मुळे काढून टाका.
  • जिथे पिकाची ओळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळीमधून नमुना घ्या.Soil Sampling I - How to take a soil sample - Farming For a Better Climate
  • नमूना घेताना सरल रेषेत न घेता वरील आकृतीत दाखवल्या प्रमाणे इंग्लिश ‘W’ आकारा प्रमाणे नमुने घ्यावे.
  • नुकतेच खते टाकलेल्या जमिनी खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमिन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगार्‍या जवळील जागा, शेतातील बांधकामा जवळील परिसर कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेवू नका.
    KVK, Cachar:Soil Testing Method
  • सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर ‘v’ आकाराचा 15 सेमी खोलीचा खड्डा करुन आतील माती बाहेर काढूा टाका. खड्डयाच्या सर्व बाजुची 2 सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टीकच्या बादलीत टाका. अशारितीने एका प्रभागातून 10 नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.SHM ICAR RC GOA
  • वरील आकृतीप्रमाणे समोरासमोरील 2 व 4 भाग काढून टाका नंतर 1 व 3 भग एकत्र मिसळा.…
  • सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टीकच्या कागदावर टाका, चांगली मिसळा, ओली असल्यास सावलीत वाळवा नंतर हया ढिगाचे चार समान भाग करा. समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा. हि प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राहीपर्यंत करा.Resource Management :: Soil :: Soli Sampling Procedure
  • भरलेली अंदाजे एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरा. पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा.
  • शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयागशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता असते.
  • फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळया थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील 30 सेमी पर्यंत, मुरुम नसल्यास 30 ते 60 सेमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत 60 ते 90 सेमी पर्यंत खोलीतील तिसर्‍या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोर्गशाळेत पाठवावे.
  • जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेमी मधील क्षार बाजूला करुन नंतरच नमुना घ्यावा.
  • सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औजाराने मातीचा नमुना घ्यावा कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची औजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरुन सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.How to collect a soil sample

मातीचे नमुना कोठे व कसा पाठवावा:

मातीचे नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती, मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी, मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.

  • शेतकर्‍यांचे पुर्ण नांव
  • पुर्ण पत्ता
  • गट नंबर / सर्व्हे नं.
  • बागायत / कोरडवाहु
  • ओलीताचे साधन
  • जमिनीचा निचरा
  • जमिनीचा प्रकार
  • जमिनीचा उतार
  • जमिनीची खोली
  • नमुना घेतल्याची तारीख
  • मागील हंगामात घेतलेले पिक व त्याचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
  • पुढील हंगामात घ्यावयाची पिके, त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.

माती परीक्षण अहवाल आल्यानंतर महत्वाचे उपाय

  • माती परिक्षण प्रयोगशाळेत मृद नमुना तपासल्यानंतर अहवालाप्रमाणे मातीचा सामू, क्षारता, मुक्त चुन्याचे प्रमाण, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, लोह, जस्त, बोरॉन व मँगेनिज इत्यादीचे प्रमाण नमुद केलेले असते. ह्या माती परिक्षण अहवालावरुन सामू सर्वसाधारणप्रमाणे 6.5 ते 7.5 पर्यंत असावा कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सामू 6.5 पेक्षा कमी असल्यास त्यांना आम्ल जमिनी म्हणतात. विशेषत: कोकणातील जमिनीचा सामू जास्त आम्लयुक्त असतो. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा शेणखतातून वापर करावा. याउलट पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जमिनीचा सामू किंचीत विम्ल ते अतिशय विम्ल (सामू 7.5 ते 9.0) प्रकारच्या आहेत. सामू 8.5 पेक्षा जास्त असलेल्या अतिविम्ल चोपण जमिनीमध्ये भूसुधारक म्हणुन जिप्समचा शेणखतातुन वापर करावा. मात्र चुनखडीयुक्त चोपण जमिनींची सुधारणा करतानां जिप्सम ऐवजी गंधकांचा शेणखतातून वापर करावा.
  • जमिनीचा दुसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे क्षारता आणि ही क्षारता प्रयोगशाळेत इलेक्ट्रीक कंडक्टीव्हीटी या उपकराणाव्दारे जमिनीतील किंवा पाण्यातील एकुण विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण मोजले जाते. मातीमधील विद्युत वाहकता (क्षारता) 1.25 डेसी. सा./मीटर पेक्षा जास्त असेल तर त्यांना क्षारयुक्त जमिनी म्हणतात. अशा जमिनीच्या पृष्ठभागावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. त्यामूळे मातीची क्षारता सर्वसाधारणपणे 0.10 ते 0.40 डेसी. सा./मीटर या दरम्यानच असावी त्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीस निचर्‍याची व्यवस्था चर खोदून करावी. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा, हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत आणि चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनास वापरुन अतिरिक्त क्षाराचा निचरा करावा. चांगल्या प्रतिच्या पाण्याची क्षारता 0.5 डेसी. सा. / मीटर पेक्षा कमी असते. ही क्षारता 2.5 डेसी. सा. / मीटर पेक्षा जास्त असल्यास असे पाणी सिंचनास अयोग्य समजले जाते. पाण्याची क्षारता 3.15 डेसी. सा./मीटर पेक्षा जास्त असल्यास ठिबकसाठी अयोग्य समेाले जाते.
  • जमिनीचा तिसरा पायाभूत* गुणधर्म म्हणजे मुक्त चुनखडीचे प्रमाण. हे प्रमाण 5% पेक्षा कमी असल्यास (कमी), तर 5 ते 10% (मध्यम), 10 ते 15% (जास्त), आणि 15% पेक्षा जास्त असल्यास पिकास हानिकारक ठरते. जास्त चुनखडीयुक्त जमीन असल्यास जमिनीत लोहाची कमतरता येते व ऊसावर, द्राक्ष पिकावर केवडा पडतो. चुनखडीयुक्त जमीनीची घनता वाढते, घडण/संरचना कठीण बनते. हुमणी, उधई आणि सुत्रकृमी या किंडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. तसेच सामू विम्लधर्मीय होतो व क्षारता 1.0 डेसी सा./मीटर पेक्षा कमी असते. अशा चुनखडीयुक्त जमिनीत नत्र, अमोनियम सल्फेटव्दारे व स्फुरद हे डायअमोनियम फॉस्फेटव्दारे द्यावे. पीएसबी या जीवाणू खतांचा वापर बिजप्रक्रियेव्दारे किंवा शेणखतातून प्रत्येक पिकासाठी करावा. ठिबकव्दारे स्फुरद नियंत्रीत प्रमाणात फॉस्फरीक अ‍ॅसीडव्दारे द्यावे. तसेच चुनखडी प्रतिकारक पिके…

माती परिक्षणाचे फायदे:

  • जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात.
  • जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
  • जमिन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येतात.
  • खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
  • आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत.
  • जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते.
  • माती परिक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमवता येते व जामिनीचे प्रकार निश्‍चित करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *