Beneficial Microorganisms : शेती साठी फायद्याचे जैविक सूक्ष्मजीव…

microorganisms beneficial

Beneficial Microorganisms : फायद्याचे जैविक सूक्ष्मजीव

मातीत सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. म्हणजेच जिवाणू, विषाणू, प्रोटोझोआ, बुरशी आणि शेवाळांचे प्रकार. कुठल्या जमिनीत कुठल्या प्रकारचे सूक्ष्मजीव सापडतात, हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. यात जमिनीची आम्लता, तापमान, ओलावा, सेंद्रिय पदार्थ इत्यादींचा समावेश असतो. जमिनीच्या वरील स्तरात जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव आढळतात व त्यांत विविधताही अधिक असते. ज्या मातीत प्राणवायू अधिक असतो, तेथेही सूक्ष्मजीव जास्त असतात. प्राणवायूची कमतरता सूक्ष्मजीवांची मात्रा व विविधता दोन्ही कमी करते. मातीतील सूक्ष्म जीवाणूंमध्ये हवामान व ऋतूप्रमाणे बदल झालेला आढळतो. सूक्ष्मजीव या बदलांशी पटकन जुळवून घेतात व भौगोलिक स्थानाप्रमाणे त्यांच्यात बदल झालेला दिसतो.

Effective Microorganisms vs Beneficial Microorganisms – Should You Use Them  in the Garden?

Beneficial Microorganisms

ट्रायकोडर्मा – एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी , डाऊनि ,जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

स्युडोमनास – एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , भुरी , डाऊनि , जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

अँपिलोमयसिंन -एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

बॅसिलस सबटीलस – एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , डाऊनि , सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस – एक जिवाणू जो अळी वर जगतो , आणि अळी चा नायनाट करतो.

ब्युव्हेरिया ब्रासीना – एक बुरशी जी रस शोषक किडीवर जगते , आणि त्यांना मारते उपयोग मावा , तुडतूडे , मिली बग , करिता उत्तम .

मेटारायझम अनिसपोली – एक बुरशी जी अळी वर्गीय किडीवर जगते , आणि त्यांना मारते उपयोग सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .

वेस्टडीकम्पोजर – तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात बहुउपयोगी .

PSB – जिवाणू जे स्फुरद उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

KMB – जिवाणू जे पालाश उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

महत्वाचे – कुठलेही मायक्रोऑर्गनिजम घरी नेले की वाढवता येतात

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *