ह्युमिक अँसिड – शेतकऱ्यांसाठी एक वरदान…

ह्युमिक अँसिड – ह्युमिक अँसिड म्हटल्यानंतर आपणास हे काहीतरी जहाल औषध असावे असे वाटते. मात्र, हा एक सौम्य असा घटक आहे. शेणखताचे जे काही चांगले गुणधर्म आहेत ते सर्व ह्युमसमुळे आहेत आणि हेच ह्युमस ह्युमिक अँसिडमध्ये आहे. दिवसेंदिवस शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर कमी होत चालला; पण याउलट उत्पादन वाढवणे चालूच आहे. मग ही जमीन आपणास जास्त दिवस कशी साथ देईल, जमिनीची सुपीकता कायम राहावी यासाठी ह्युमसचा वापर अनिवार्य आहे. आपण जे जमिनीमधून घेतो याचा काहीतरी मोबदला तिला दिला गेला पाहिजे. जमिनीतील ह्युमस शेणखत, सेंद्रिय खते, गांडूळ खत, हिरवळीचे खत याचा वापर करून वाढवता येते. त्यासाठी शक्य तेवढा याचा वापर करावा व गरज भासल्यास ह्युमिक अँसिड वापरावे.

ह्युमिक ऍसिड हे सेंद्रिय ऍसिड आहे जे मातीच्या बुरशीमध्ये आढळते. शिवाय, ही सेंद्रिय संयुगे वनस्पतींच्या मुळांना जोडतात आणि त्यांना पोषण आणि पाणी मिळण्यास मदत करतात. म्हणून, जर ह्युमिक ऍसिडचे प्रमाण जास्त असेल तर ते वनस्पतींची उत्पादन क्षमता नाटकीयरित्या वाढवेल.
शिवाय, आपण जमिनीतील ह्युमिक ऍसिड हे गडद तपकिरी रंगाचे ह्युमिक पदार्थ म्हणून पाहू शकतो जो मातीच्या उच्च pH मूल्यांवर पाण्यात विरघळतो.

ह्युमिक अँसिडचे महत्त्व म्हणजे हे कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांची जोरात वाढ करते. पिकाला अन्नरस हे पांढरे मुळेच पुरवतात व पांढरी मुळे सक्रिय सक्षम, सशक्त असतील तर आपोआप अन्नद्रव्ये शोधतील व पिकाला पुरवतील. त्यास सक्रिय सशक्त बनविण्याचे काम ह्युमिक अँसिड करते. रासायनिक खतांची पिकास उपलब्धता वाढण्यासाठी ह्युमिक अँसिडचा फार फायदा होतो.

ह्यूमस आणि ह्यूमिक पदार्थांची निर्मिती
हल्ली ह्यूमिक पदार्थांचा वापर करण्याबाबत कल वाढलेला दिसतो म्हणूनच त्याची निर्मिती कशी होते ते पहाणे उचित ठरेल. वनस्पतीत कार्बोदके , सेल्युलोज , मेद , मेण आणि लिग्निन हे घटक असते. जेव्हां सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात तेव्हा विविध जीवजंतू त्यावर तुटून पडतात. साधी कर्बोदके आणि प्रधिनांचा भाग यावर बुरशी हल्ला करतात. सेल्यूलोजवर मिक्सबॅकटेरीचा हल्ला होवून विविध फिनॉल्स तयार होतात. पॉलीफिनॉलची उप्पत्ती लिग्निन पासून किंवा सूक्ष्मजीवाणूंनी तयार केलेले अशी असते. त्यांचे रुपांतर क्विनाईनस् मध्ये होते जी नत्राबरोबर अभिक्रिया करुन तपकिरी ह्यूमिक पदार्थ तयार करतात. पुष्कळसे जीवाणूं लिग्निचे अपघटन घडवून फिनॉल तयार करतात जे ह्युमसच्या निर्मितीत प्रमुख घटक म्हणून काम करतात. ह्युमिक आणि फुलविक आम्लात अॅमिनो आम्ल असतात नेहमी प्रमाणे तयार केलेली ह्युमिक आम्ल पाण्यात लागलीच विद्राव्य नसतात. पहिल्यांदा त्यांचे क्षारात रुपांतर होते . उदा . सोडीयम ह्यूमेट , पोटॅशियम ह्यूमेट. आणि म्हणूनच ह्यूमिक आम्लांची खरेदी करताना ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी.

Soluble Humic Acid helps to retain vital plant nutrients | Ferti Organic
मृदेतील ह्यूमसचे कार्य:
ह्यूमस मृदेची जलधारण क्षमता वाढविते. रेताड जमिनीत वाढून कठा एकत्रित बंधनात ढेवण्यास मदत करते. चिकनमाती आणि वालुकयुक्त मातीत सुद्धा मृदेची जडणघडण सुधारते. त्यात आयन शोषण्याची क्षमता जास्त असते. चिकनमातीच्या ४-६ % जादा इतकी ती भरते. उभयांतर वर्तक म्हणूनही ते कार्य करते. वनस्पतीसाठी ते पूर्णान्न आहे. कारण त्यात वाढीस लागणारी सर्व पोषद्रव्ये आहेत. मृदेत ह्यूमस असल्याच तिच्या सामूत अचानक बदल घडत नाही. भौतिक दृष्ट्या मातीचा रंग पोत घडण जलधारण क्षमता यांच्यात परिवर्तन होवून जलमिस्सारणात , हवेशीरतेत वाढ होते. माती अधिक सच्छिद्र बनते. रासायनिक दृष्ट्या ह्युमस पोषद्रव्यांचे स्त्रोत म्हणून कार्य करते सोबत मृदेची उमय प्रतिरोधक क्षमता वाढवते काही मृदा खनिजांची विद्राव्यता वाढवते ; लोहासारख्या मुलद्रव्याला चिलेशन क्षमता असल्याने ते ताबडतोब उपलब्ध होतात. सर्व सूक्ष्मजीवांचे अन्न म्हणून ह्यूमचे कार्य सर्वांना माहित आहेच. मृदेत युक्त स्थितीत असलेल्या कॅल्शियम कार्बोनेटचे बरेच प्रमाण असेल तर अपघटन होण्यासारखे सेंद्रिये पदार्थ सुयोग्य पातळीत राखून तसेच मूळांचा श्वसनाचा वेग वाढवून मृदेची पारगग्यता राखऱ्यास ह्युमस मदत करते विघटन होवू शकणाऱ्या सेंद्रिय घटकांपासून कार्बनडाय ऑक्साईड वायू तयार होतो. मृदेतील जड धातू सेंद्रिय घटकांबरोबर अमिक्रिया घडवून आणतात. त्यापासून जटिल संयुगे बनतात. मातीमध्ये धातू द्रावण प्रावरयेत असतात. विद्राव्य स्वरुपातील धातू- सेंद्र संयुगे पोषणदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाची आहे.

पोटॅशियम ह्युमेट आणि ह्युमिक ऍसिडमधील फरक.
पोटॅशियम ह्युमेट आणि ह्युमिक ऍसिडमधील महत्त्वाचा फरक असा आहे की पोटॅशियम ह्युमेट हे ह्युमिक ऍसिडचे पोटॅशियम मीठ(salt) आहे, तर ह्युमिक ऍसिड हे एक महत्त्वाचे सेंद्रिय ऍसिड आहे जे मातीमधील घटक म्हणून आढळते.
ह्युमिक ऍसिड आणि पोटॅशियम ह्युमेट हे साधारणपणे सुपीक जमिनीत अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. शिवाय, ह्युमेट हा ह्युमिक ऍसिडचा संयुग्मित आधार आहे. पोटॅशियम ह्युमेट पाण्यात सहज विरघळते कारण ते आयनिक कंपाऊंड आहे, परंतु ह्युमिक ऍसिड केवळ उच्च माती pH मूल्यांवर पाण्यात विरघळते.

Humic Acid Shiny Ball Organic Fertilizers Manufacturer in India

पोटॅशियम ह्युमेट म्हणजे काय?
पोटॅशियम ह्युमेट हे ह्युमिक ऍसिडचे पोटॅशियम मीठ आहे. ह्युमेट हा ह्युमिक ऍसिडचा संयुग्मित आधार आहे. विशेष म्हणजे, खतांमधील घटक म्हणून हे कंपाऊंड शेतीमध्ये महत्त्वाचे आहे.
व्यावसायिकदृष्ट्या लिग्नाइट (तपकिरी कोळसा) च्या अल्कधर्मी उत्सर्जनाद्वारे त्याचे उत्पादन केले जाते. शिवाय, हे कंपाऊंड पाण्यात विरघळणारे आहे, आणि ते त्वरीत पाण्यात विरघळू शकते; त्यामुळे खत म्हणून ते खूप उपयुक्त आहे. शिवाय, पिके हे संयुग वनस्पती सहजपणे शोषून घेऊ शकतात कारण ते पाण्यात विरघळल्यावर आयनमध्ये विरघळते. तसेच, पिकांद्वारे या कंपाऊंडचे शोषण आणि वापर दर खूप जास्त आहे.

पोटॅशियम हुमेटचा सेंद्रिय पोटॅश खत म्हणून वापर
*पिकांचे प्रकाश संश्लेषण वाढते,
*क्लोरोफिल घनता वाढते तसेच वनस्पती मूळ श्वसन वाढवा आणि,
*यामुळे वनस्पतींची उत्तम वाढ होतेआणि जास्त उत्पन्न मिळते.

Applications of Humic Acid as Plant Growth Stimulants – ECOgardener

ह्युमिक अँसिडचे बाजारात उपलब्ध प्रकार

साधारणतः तीन प्रकारचे ह्युमिक अँसिड बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये ६ टक्के प्रमाण असलेले ह्युमिक अँसिड दाणेदार, १२ टक्के प्रमाण असलेले ह्युमिक अँसिड द्रवरूप व १२ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण असलेले ज्यामध्ये ९८ टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, ह्युमिक अँसिड हे दाणेदारमध्ये ६ टक्के व द्रवरूप १२ टक्के या स्वरूपात वापरणे चांगले, असे जाणकारांचे मत आहे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात टक्केवारी असलेले त्या ह्युमिक अँसिडची (सोल्युबिलिटी) विरघळण्याची क्षमता असू शकते. रासायनिक खतांचा बराच अंश पिकाला मिळत नाही. बरीच अन्नद्रव्ये जमिनीमध्ये फिक्स होतात व पीक त्यांचे सहज शोषण करू शकत नाही. अशा वेळेस ह्युमिक अँसिडवापरलेले असल्यास पांढऱ्या मुळांना शक्ती मिळाल्याने ही अन्नद्रव्ये शोषण्यास मदत होते. ह्युमिक अँसिडच्या वापराचा सर्वांत जास्त फायदा जमिनीखाली वाढणाऱ्या पिकांना जसे अद्रक, हळद, कांदा, बटाटा यांना होतो. यासोबतच कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, ऊस यांनासुद्धा याचा फायदा होतो. त्याच्या वापराच्या विविध पद्धतींमध्ये पेरणीबरोबर किंवा खताच्या दुसऱ्या मात्रेबरोबर दाणेदार ह्युमिक अँसिड एकरी ५ ते १० किलो वापरावे. हे रासायनिक खतामध्येसुद्धा मिसळून टाकता येते. आपल्या खर्चाच्या नियोजनानुसार एकरी दाणेदार ६% ह्युमिक अँसिड ५ किलो द्यायचे की १० किलो द्यायचे ते आपण ठरवावे. याचा वापर जास्त केला तरी फायदाच होतो. नुकसान होत नाही. जमिनीमधून वापरल्यानंतर एक वेळेस द्रवरूप ह्युमिक अँसिड १२% फवारणीमध्येसुद्धा वापरायला चालते. जमिनीतून न वापरल्यास दोन वेळेस फवारणीतून वापरावे. ह्युमिक अँसिड वापरण्याची तिसरी व सर्वांत फायद्याची पद्धत म्हणजे पीक लहान असताना ठिबक सिंचनामधून किंवा ठिबक नसल्यास पाठीवरच्या पंपात पाण्यात टाकून हे मिश्रण झाडांच्या बुडाशी टाकावे. ठिबकद्वारे किंवा ड्रेचिंगद्वारे एकरी दीड ते दोन लिटर ह्युमिक अँसिड वापरल्यास खूपच चांगले परिणाम दिसतात.

ह्युमिक अँसिडचे ड्रेचिंग (बुडाशी टाकणेकरीत असल्यास सोबत  किलो फवारणीचे सल्फर डब्ल्यूडीजी   किलो कॅल्शिअम नायट्रेट एकरी दिल्यास दुय्यम घटकांची गरजसुद्धा यातून पूर्ण होते. जमिनीतून सिंगल सुपर फॉस्फेट वापरले असल्यास सल्फर व कॅल्शिअम नायट्रेट वापरण्याची गरज नाही. अशा प्रकारे ह्युमिक अँसिड हे शेतकऱ्यांना एक वरदान ठरू शकते. फक्त ते चांगल्या गुणवत्तेचे मिळणे फारच महत्त्वाचे आहे. ह्युमिक अँसिड जवळपास सर्व रसायनांसोबत फवारणीस योग्य आहे.

Potassium humate uses in soil,seeds and plants. • JINGFENG HUMIC

ह्युमिक अँसिडचे फायदे :

  • स्फुरदाचे स्थिरीकरण – जमीनीतील कैल्शियम, मैग्नीशियम, एल्यूमीनियम, लोह या मूलतत्वांशी बद्ध होण्याच्या गुणधर्मामुळे स्फुरद अनुपलब्ध होते. ह्युमिक पदार्थ असे होवू देत नाही व स्फुरद उपलब्ध राहते. (स्फुरद्युक्त खतांसोबत ह्युमिक दिले तर)
  • ह्यूमिक सोबत नत्र जास्त दिवस परिणामकारक राहतो व उत्पादन वाढवतो. (नत्र युक्त खतांसोबत ह्युमिक दिले तर)
  • वनस्पतीच्या बाह्य पेशींची संवेदनशीलता वाढवल्यामुळे पाने, मुळे अधिक अन्नद्रव्यांचे ग्रहण करू शकतात.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.
  • ह्युमिक ऍसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.
  • मातीच्या उच्च धन आयन विनिमय क्षमता (CEC) मुळे अन्नद्रव्य धरून ठेवता येतात. त्याचा निचरा होत नाही.
  • हे एक नैसर्गिक बफरिंग एजंट असून उच्च सामू व सोडियम मुळे होणार्‍या परिणामांपासून संरक्षण करते.
  • नैसर्गिक चिलेटिंग / कॉम्प्लेक्सिंग एजंट असल्यामुळे मातीतील अन्नद्रव्य दीर्घकाळ उपलब्ध स्थितीमध्ये धरून ठेवते व सर्व पोषक तत्वांची वनस्पतीसाठी उपलब्धता वाढवते.
  • मातीची रचना, भुसभुशीतपणा, पाणी जमीनीत मुरण्याचा वेग तसेच पाणी धारण करण्याची क्षमता वाढवते.
  • बियाण्यांची उगवण क्षमता वाढवते व लवकर अंकुरण होते.
  • मातीच्या कणांच्या पोकळ्यांमध्ये वायूंचे अदान-प्रदान वाढवते. ज्यामुळे मुळांचा भरपूर विकास होतो. मुळांची वाढ उत्तम होत. प्रयोगांमध्ये दिसून येते कि त्याच्या वापराने मुळांची वाढ २०-५०% अधिक होते.
  • ह्युमिक ऍसिड / फुल्विक ऍसिड हे उत्तम जैव-उत्तेजक असून सौम्य तीव्रतेचा वापर अधिक परिणामकारक असल्याचे दिसून येते.
  • फळे आणि भाज्यांमधील शर्करेचे (Brix) प्रमाण वाढवते.
  • ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
  • मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिर ठरते.
  • नत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.
  • याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.
  • ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.
  • जमिन हलकी होऊन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
  • याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कॅल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.
  • बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
  • ह्युमिक ऍसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.
  • सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.
  • युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.

शेतीमध्ये, ह्युमिक अँसिड बहुतेकदा माती कंडिशनर म्हणून किंवा सेंद्रिय खतांचा घटक म्हणून मातीवर लावले जाते. याचा उपयोग मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी, पोषक तत्वांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि वनस्पतींची एकूण वाढ वाढवण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, निरोगी वनस्पती विकासास समर्थन देण्यासाठी हायड्रोपोनिक्स आणि हरितगृह लागवडीमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.

एकूणच, कृत्रिम रसायनांची गरज कमी करून मातीची सुपीकता आणि वनस्पतींची कार्यक्षमता सुधारून आधुनिक शेतीमध्ये ह्युमिक अँसिड  मोलाची भूमिका बजावते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *