मायक्रोरायझा (Mycorrhiza) -VAM – संपूर्ण माहिती ….

Mycorrhiza

मायक्रोरायझा म्हणजे काय ?

मायकोरिझा हा शब्द बऱ्याच शेतकऱ्याना माहिती असेल. विविध पिकाची चागंली वाढ होण्यासाठी मायक्रोरायझा ची गरज असते. पण मातीत मायकोरिझा नक्की काय आहेत आणि आपण एक शेतकरी म्हणून काय माहिती करून घेऊ शकतो ह्या बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी, आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असे आपण म्हणु शकतो. पिकाच्या मुळांवर वाढुन हि बुरशी एक प्रकारे मुळांचा विस्तार वाढवत असते, ज्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये ग्रहण होते.
Mycorrhizae ( एकवचन: mycorrhiza) ही बुरशीयुक्त रचना आहेत जी प्रत्यक्ष पीक आणि बुरशी यांच्यातील प्रत्यक्ष संबंध ठेवण्याचे काम करत असते . Mycorrhizae हे नाव लॅटिन “मायको” म्हणजे “बुरशीचे” आणि ग्रीक “rhiza” म्हणजे “मूळ” या शब्दापासून तयार झाले आहे. मायकोरिझा हे हायफे किंवा लहान तंतूंचे जाळे आहे जे जमिनीत हे प्रत्यक्ष पीक आणि बुरशी ह्याना जोडलेले असते. यामध्ये लाखो सूक्ष्म तंतू मातीत अस्तित्वात असतात . ते नेहमी उघड्या डोळ्यांनी दिसत नसले तरी, एक चमचा वावरातिल मातीमध्ये पृथ्वीवरील लोकांसंख्ये पेक्षा जास्त सूक्ष्मजीव बुरशी आणि जीवाणू त्यामध्ये असू शकतात असे सांगितले जाते.
Glomus, Gigaspora, Caulospora, Entrophospora Sclerocystis and Scutellospora ह्या जीनस (Genus) मधिल बुरशी पृथ्वीवर असलेल्या जवळपास 80 टक्के वनस्पतींच्या मुळांसोबत राहुन एक सहजीवी जीवन जगतात.
बुरशी आणि उन्नत वनस्पतींच्या मुळांच्या ह्या सहवासास ४०० ते ५०० मिलियन वर्षांचा इतिहास आहे. ग्लोमेरोमायकोटा गटातील ग्लोमस, गिगास्पोरा, अक्युलोस्पोरा, एन्ट्रोफोस्पोरा, स्लेरोसिस्ट आणि स्कटेलोस्पोरा ह्या वर्गातील बुरशी उन्नत पिकांच्या मुळांच्या आत काही अंतरापर्यंत वाढून पिकाकडुन शर्करा आणि अन्नरस मिळवतात, आणि त्या बदल्यात पिकांस प्रामुख्याने आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता करुन देत असतात.
ह्या वर्गातील बुरशींना व्हॅस्क्युलर अर्ब्युस्कुलर मायकोरायझा Vascular arbuscular mycorrhiza : VAM) म्हणजेच व्हॅम असे देखिल म्हणतात. ह्या बुरशी पिकांच्या मुळांच्या वर वाढतात. पिकाच्या मुळांत असलेल्या पेशींच्या आत ह्या बुरशी शिरत नाहीत तर पेशी भित्तिकेच्या आत वाढतात. त्या ठिकाणी ह्या बुरशी काहीशा फुग्याच्या आकाराची वाढ करतात तर काही वेळेस अनेक फांद्या उप फांद्या असल्या सारखी वाढ करतात. मुळांच्या पेशी भित्तिकेत अशा प्रकारे वाढल्यामुळे पेशीतील अन्नरस आणि बुरशीद्वारे जमिनीतुन शोषुन घेतलेला रस, स्फुरद, सुक्ष्म अन्नद्रव्य यांची देवाणघेवाण सहज करणे शक्य होते.
सर्व पिका पैकी सुमारे 90% पिके वाढीसाठी मायकोरिझावर अवलंबून असतात. ते पिकाच्या प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार होणारे कार्बोहायड्रेट्स आणि शर्करासारखे पोषक तत्वे जमिनीखालील बुरशींना उपलब्ध करून देण्याचे काम करतात . मातीतील फॉस्फरस आणि नायट्रोजन सारख्या अन्नद्रव्याना अनलॉक करून, तयार स्वरूपात शोषणासाठी पिकाच्या मुळांपर्यंत मार्ग तयार करून मायकोरायझी पिकाना फायदा देतात. पिकाच्या च्या जगण्यासाठी मायकोरायझाईशी फायदेशीर संबंध अनेकदा आवश्यक असतो . ह्या मुळे पिकाची ची लवचिकता, उत्पादन आणि दीर्घायुष्य सुधारण्यास मदत होत असते .
एकुण दोन प्रकारचे मायकोरायझी अस्तित्वात आहेत – त्यापैकी एक एंडोमायकोरिझा आणि दूसरा एक्टोमायकोरिझा. मायकोरिझा वापरणार्या सुमारे ८५% पिके एंडो-मायकोरायझीसोबत माती मध्ये काम करतात. बर्याच वार्षिक आणि बारमाही भाज्या, शोभेच्या वनस्पती, फुले आणि गवतांसह एंडो-मायकोरिझाईचा वापर करत असतात . जवळजवळ 10% मायकोरायझी वापरणारे पिके एक्टो-मायकोरायझी सोबतच काम करतात, ज्यात बहुतेक हार्डवुड आणि शंकूच्या आकाराची झाडे, गुलाब आणि काही इतर वृक्षाच्छादित शोभेच्या झाडाचा समावेश होऊ शकतो .

ह्या बुरशींच्या मायसेलियम मधुन ग्लोमॅलिन हे एक ग्लायकोप्रोटिन स्रवले जाते जे जमिनीतील सर्वात मोठा कार्बन स्रोत म्हणुन कार्य करते. बुरशी आणि मुळांच्या अशा एकत्र वाढल्याने, मुळांना जमिनीतील अन्नद्रव्ये प्रामुख्याने फॉस्फोरस चा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो. शिवाय पिकाच्या पांढऱ्या मुळांपेक्षा देखिल जास्त मोठ्या अशा पृष्ठभागामुळे (Surface area) मायकोरायझा ची बुरशी जास्त प्रमाणात अन्नद्रव्य शोषुन घेवु शकते.
पिकाच्या मुळांद्वारा स्रवल्या जाणाऱ्या स्ट्रिगोलॅक्टोन्स मुळे मायकोरायझा च्या बुरशीचे स्पोअर्स रुजण्यास मदत मिळते. जर जमिनीत स्फुरद ची मात्रा कमी प्रमाणात असेल तर मायकोराझा बुरशीची वाढ आणि तिला येणाऱ्या फांद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जमिनीत जास्त प्रमाणात स्फुरद (फॉस्फोरस) असल्यास ह्या बुरशीची वाढ थांबते. ह्या मुळेच मायकोरायझा चा वापर आणि त्यापासुन मिळणारे फायदे ह्यावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा येतात. जमिनीत ३० ppm इतका फॉस्फोरस असल्यानंतर मायकोरायझा ची वाढ काही प्रमाणात कमी होते, तर ३०० ppm पेक्षा जास्त प्रमाणात फॉस्फोरस असल्यानंतर हि वाढ पुर्णपणे थांबुन जाते.

मायकोरायझा च्या वाढीमुळे पिकास जमिनीतील अन्नद्रव्ये भरपुर प्रमाणात तर मिळतातच मात्र त्यासोबतच पिकाचे जमिनीतील हानीकारक बुरशींच्या हल्लयापासुन देखिल रक्षण होत.
ह्या शिवाय एक्टोमायकोरायझा असा एक वर्ग आहे जो गुलाब, निलगिरी वै. वनस्पतीच्या सोबत वाढतो. ह्या वर्गातील बुरशींची संख्या हि २००০ पेक्षा जास्त आहे. आणि प्रत्येक बुरशी एका विशिष्ट अशा वनस्पतीच्या मुळांसोबतच सहवास करुन राहते. ह्या गटातील मायकोराझा जगभरातील केवळ ५ टक्के वनस्पतींच्या सोबत राहतात असा कयास आहे.

मुळां सोबत मायक्रोरायझा जमिनीत वाढलेली बुरसी.

 फायदे

 • स्फुरद, नत्र, गंधक तसेच तांबे, जस्त, मॅग्नेशियम आणि लोह यांची उपलब्धता मुळालगत वाढवितो. ज्यामुळे खत वापरात ५० टक्के बचत होऊ शकते.
 • पिकांची वाढ आणि उत्पन्न वाढविते तसेच हरितद्रव्ये तयार करण्याची संश्लेषण क्रिया गतिमान करून झाडातील आवश्यकसंजीवके वाढवून फलधारणा वृद्धिंगत करते.
 • मुळावरील आवरणामुळे जवळचे किंवा लांबचे जमिनीतील पाणी शोषण्याचे प्रमाण वाढवितेआणि त्यामुळे कमी पाण्यातही पिकाला वाचविले जाते.
 • जमिनीची प्रत राखते, सुधारते त्याचबरोबर जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून सशक्त पीक निर्माण झाल्यामुळे मुळावाटे येणारे बुरशी, अणूजीव, सूञ्रकृमीमुळे होणाऱ्या रोगास अवरोधन करते.
 • सर्व प्रकारच्या पिकांच्या मुळांवर वाढत असल्यामुळे त्याचा वापर चारा पिकांवर देखील उपयुक्‍त आहे.
 • मोठया प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या इतर जिवाणू खतांसोबत उदा. रायझोबियम, अँझोटोबॅक्टर, अँसिटोबॅक्टर यांच्यासोबत संयुक्तपणे मायकोरायझाचा वापर अतिशय उपयुक्त आढळला आहे.
 • विविध तापमानावर व जमिनीतील तसेच हवामानातील होणाऱ्या अचानक बदलांपासून वाचविण्याचे कार्य मायकोरायझा करते.
 • सर्व प्रकारच्या वनस्पती, पिकांसाठी तसेच मानव आणि प्राणिमात्र-पशुपक्षी यांना पूरक असे हे जिवाणू संवर्धक आहे.
मायक्रोरायझा ची मक्का बियाण्या वर प्रक्रिया न करता आणि केल्या नंतर फरक दिसत आहे.

बियाण्याची प्रक्रिया

 • थोडा गुळाचा वापर करून व्हॅम मिसळलेल्या द्रावणाची बियाणांवर शिंपडणी करून सावलीत २-३ तास बी सुकवून नंतर पेरणी केल्यास उगवणक्षमता वाढते.
 • १ एकरासाठी लागणाऱ्या बियाण्यास १ ते २ किलो व्हॅमची प्रक्रिया उपयुक्त आढळली. तीच मात्रा जमिनीत कंपोस्ट खतासोबत मिसळून देण्याकरिता एकरी १० किलो व्हॅम कल्चर किंवा व्हॅम संवर्धन उपयुक्‍तआहे.
 • विशेषतः ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूर, तूर, हरभरा, सूर्यफूल यासाठी सरींमधून पेरताना १० किलो प्रतिएकर व्हॅम प्रभावी आढळले आहे.
 • भाजीपाल्यासाठी वांगी, टोमॅटो, मिरची, दोडके, कलिंगड, काकडी, ऊस, तुती यासाठी प्रतिएकर ५ किलो व्हॅम.
 • भेंडी, गवार, मका, करडई, कपाशी साठी प्रतिएकरी १० किलो.
 • कांदा, घेवडा, वाटाणा, भात, गहू, नाचणी, ज्वारी यासाठी प्रतिएकरी १५ किलो व्हॅम जमिनीतून द्यावे.
 • काजू, नारळ, सुपारी, मसाला पिके, भाजीपाला आणि ऊस इत्यादींच्या रोपवाटिकांमध्ये व्हॅमचा वापर निश्‍चितपणे रोपवाटिकेत होणारी मर कमी करण्यासाठी उपयुक्‍त आहे.
 • त्यासाठीगादी वाफ्यामध्ये रोप तयार करण्यास बी पेरण्यापूर्वी प्रतिएकर ५ किलो व्हॅम वरील पृष्ठभागात मिसळणे आवश्यक आहे.
 • लागवडीपूर्वी सर्व रोपांची मुळे २० ते २५ ग्रॅम व्हॅम ५ किलो गांडूळखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून गादी वाफ्यावर ओळीत लावून त्यावर रोपे लावल्यास ती जोमदार होतात.
 •  वनिकी रोपांच्या पिशव्यांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये १० ते १५ ग्रॅम व्हॅम ५० किलो गांडूळखत, कंपोस्ट किंवा मातीत मिसळून मुळाल्यात मिसळल्यामुळे रोपांची मर कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *